MSEDCL Saam Tv
महाराष्ट्र

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणचा दणका; ६ वीजमीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

राज्यामध्ये महावितरणने नेमलेल्या वीज मीटर रीडिंग एजन्सीकडून चुकीचे मीटर रीडिंग केल्यामुळे महावितरण आणि ग्राहक या दोघांनाही आर्थिक भुर्दंड बसत होता.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - चुकीचे वीज मीटर रिडींग घेऊन सर्वसामान्य ग्राहकांचा आर्थिक आणि मानसिक छळ करणाऱ्या खाजगी एजन्सीचा महावितरणने (MSEDCL) बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे. चुकीचे वीज मिटर रिडींग घेऊन महावितरणचे नुकसान करणाऱ्या आणि विज बिल (Electricity Bill) दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक आर्थिक, मानसिक त्रास देणाऱ्या राज्यातील खाजगी सहा मीटर रीडिंग करणाऱ्या एजन्सींचे महावितरणने काम बंद केलं आहे.

हे देखील पहा -

यात औरंगाबाद जिल्ह्यातील १, पुणे जिल्ह्यातील २, वसई, नांदेड आणि अकोला येथील प्रत्येकी एक मिटर रिडींग करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्यात आली आहे. या एजन्सींना काळा यादीत टाकण्याची प्रक्रियाही महावितरणने सुरू केली आहे. राज्यामध्ये महावितरणने नेमलेल्या वीज मीटर रीडिंग एजन्सीकडून चुकीचे मीटर रीडिंग केल्यामुळे महावितरण आणि ग्राहक या दोघांनाही आर्थिक भुर्दंड बसत होता. त्यात ग्राहकांना गरज नसताना मीटर तपासणी करण्यासाठी, मीटर बदलून घेण्यासाठी पैसे भरावे लागत आहे.

त्यासोबतच गरज नसताना महावितरणला कामे करण्याची वेळ आलीय. त्यात महावितरणचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे याची पूर्ण चौकशी केल्यानंतर चुकीचे मिटर रिडींग घेतल्यामुळे या नुकसानाला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे महावितरणने मीटर रीडिंगची अचूक नोंद करण्यासाठी उपाययोजना सुरु केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Mega Block : रेल्वेचा मोठा निर्णय! रविवारचा मेगा ब्लॉग रद्द, पण 'या' दिवशी असेल ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra News Live Update : लग्न सोहळा असलेल्या बिल्डींगला लागली अचानक भिषण आग

Husband kills wife: बायको सतत चॅट करायची, संतापून पतीने केली हत्या; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे हत्येचं गूढ उकललं

Avoid Chinese Benefits: १ महिना चायनिज खाणं बंद केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Brocoli Benefits For Hair Growth: केस ओढले तरी तुटणार नाहीत, हिरवी भाजी ठरेल वरदान, खाण्यापूर्वी फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT