MPSC Success Story Saam Tv
महाराष्ट्र

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका; ४ तरुणांची उपजिल्हाधिकारी पदावर वर्णी

MPSC Success Story of Solapur Students: काल एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात सोलापूरातील अनेक तरुणांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

MPSC परीक्षेत सोलापूरचा डंका

अनेक विद्यार्थ्यांनी मिळवले उल्लेखनीय यश

महाराष्ट्र शासनात विविध पदांवर काम करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) २०२४ चा निकाल जाहीर झाला. एमपीएससी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत राज्यभरात आपला ठसा उमटवला आहे. उपजिल्हाधिकारी पदाच्या एकूण सात जागांपैकी तब्बल चार जागांवर सोलापूरच्या उमेदवारांनी यश संपादन केले आहे.

एमपीएससीच्या निकालात विजय लामकाने यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मुलींमध्ये आरती जाधव हिने अव्वल स्थान मिळवत सोलापूरचा झेंडा उंचावला. सोलापूर शहरातील पवन नागनाथ मंगरुळे आणि करमाळा तालुक्यातील सालसे येथील अमित गोकुळ लोकारे यांनीही उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

एमपीएससीच्या इतर विविध पदांवरही सोलापूरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. सांगोला शहरातील डॉ. हिमालय घोरपडे आणि धायटी (ता. सांगोला) येथील रविकांत चंद्रकांत पाटील यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली आहे. अकलूज येथील समर्थ संजय राकले, तसेच सायली शिवाजी परांडे यांनीही सहाय्यक राज्यकर आयुक्त पदाला गवसणी घातली आहे.

फोन्डशिरस येथील काजल बेबी विलास भोसले यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण, आदिवासी विभाग) पदावर निवड झाली आहे. मांडकी (ता. माळशिरस) येथील सागर केशव रणनवरे यांची सहाय्यक संचालक (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) पदावर निवड झाली आहे. सोलापूर शहरातील प्रज्ञा चौधरी यांनी मुख्याधिकारी पद पटकावले आहे.

सुर्डी (ता. बार्शी) येथील अक्षय ईश्वर काळे यांनी गटविकास अधिकारी पद मिळवले. तर फळवणी (ता. माळशिरस) येथील नितीन किसन आसबे यांनी सहाय्यक राज्यकर आयुक्त पदाला गवसणी घातली आहे. गिरवी (ता. माळशिरस) येथील दिपाली शिवाजी खरात हिने NT-C महिला प्रवर्गातून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. माळशिरसचे प्रदीप गोरड यांची पोलीस उपअधीक्षकपदी, तर बार्शी तालुक्यातील सतिश भराटे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली आहे.

एकाच जिल्ह्यातून खूप जास्त उमेदवारांची एमपीएससी परीक्षेत निवड होणे अभिमानाची बाब असून सोलापूर जिल्ह्याची राज्याच्या गुणवत्ता यादीत दमदार एंट्री झाली आहे. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून यशस्वी उमेदवारांचे कौतुक होत आहे. हा निकाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : विनयभंगाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी, प्राचार्याकडून उकळले लाखो रुपये; पुण्यात ३ पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार, तिघे गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

Husband Wife: कुठे स्वामी तर कुठे गंडा, देशात नवऱ्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात स्त्रिया

Ajit Pawar Case: 'लहान भावाचा काटा काढण्यात मोठ्या भावाचा हात', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

SCROLL FOR NEXT