Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: जिद्द! एकदा नव्हे तर ६ वेळा MPSC क्रॅक; नांदेडचा लेक झाला क्लास १ ऑफिसर; ओमकेश जाधव यांचा प्रवास

MPSC Succcess Story Omkesh Jadhav: नांदेडच्या ओमकेशन जाधव यांनी क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांनी एकदा नव्हे तर सहा वेळा एमपीएससी परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

ओमकेश जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास

सलग सहा वेळा एमपीएससी क्रॅक

क्लास वन ऑफिसर पदाला गवसणी

प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.परंतु अनेकदा स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात. या अडचणींवर मात करत तुम्हाला पुढे जायचे असते. असंच यश नांदेडच्या ओकमेश जाधव यांनी मिळवलं. शासकीय सेवेत क्लास वन ऑफिसर बनण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले.

ओमकेश जाधव हे शासकीय सेवेत कार्यरत होते. तरीही त्यांनी एमपीएससी परीक्षा दिली. त्यांनी खूप मेहनतीने चांगले गुण मिळवले आणि क्लास वन पदावर मजल मारली. त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी एक दोन वेळा नव्हे तर सलग सहा वेळा एमपीएससी परीक्षा पास केली.

ओमकेश जाधव यांना समाजासाठी काहीतरी करायचे होते. त्यामुळे त्यांनी एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ओमकेश हे नांदेडमधील रहिवासी. त्यांचे वडील उत्तमराव जाधव हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक पदावर काम केले. ओमकेश यांना क्लास वन पदावर काम करण्याचे स्वप्न होते.

ओमकेश यांनी २०१९ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी २०२० मध्ये पहिल्यांदा एमपीएससी (MPSC) दिली.त्या परीक्षेत १२६ रँक प्राप्त केली. त्यांना शासकीय सेवेत संधी मिळाली नाही. परंतु तरीही ते खचून गेले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले.

ओमकेश यांनी २०२१ साली कामगार अधिकारी पदी निवड केली. २०२२ मध्ये उपशिक्षण अधिकारी पदावर निवड झाली. २०२३ आणि २०२४ मध्येही ते यशस्वी झाली. त्यांची पाचव्या वेळी हिंगोली जिल्ह्यात उपशिक्षण अधिकारी पदावर काम केले. दरम्यान, आता दोन दिवसांपूर्वी एमपीएससीचा रिझल्ट लागला. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी परीक्षा दिली.

ओमकेश यांची क्लास वन अधिकारी पदासाठी निवड झाली. त्यांना गट विकास अधिकारी किंवा जीएसटी विभागात सहायक आयुक्त, उद्योग उपसंचालक पदावर काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

Railway Fare Hike: मुंबई-पुणे प्रवास महागणार का? आजपासून रेल्वेचे नवीन तिकीट दर लागू, वाचा किती झाली वाढ

Heart Attack: झोपेतून उठताच थकवा जाणवतो? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २७ गावांचा एल्गार; मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा

Kitchen Hacks : रोज १५ मिनिटांत या सोप्या टिप्सने घर झटपट आवरा, तासनतास वेळ लागणारच नाही

SCROLL FOR NEXT