महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'औषध निरीक्षक' भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. नीट आणि टीईटी पेपरफुटीनंतर थेट एमपीएससीचा पेपर फुटल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. पुण्यातील 'छात्रो की गुंज' कार्यक्रमातही राहुल गांधींसमोर एका विद्यार्थींनीनं MPSC पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरुन राहुल गांधींनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत इशारा दिलाय. राहुल गांधी काय म्हणालेत पाहूया...
महाराष्ट्रात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. शांतपणे आंदोलन करतायंत. याचं कारण केवळ एक परीक्षा किंवा भरती नाही, तर संपूर्ण यंत्रणेवरील उडालेला विश्वासाचा अंत आहे. मग ती केंद्राची असो वा राज्याची, प्रत्येक विद्यार्थी भाजप सरकारमुळे त्रस्त आहे. MPSC सारख्या घटनात्मक संस्थेवर ताबा मिळवून तिची विश्वासार्हता धुळीस मिळवली. सरकारनं विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून तातडीनं कारवाई करावी. अन्यथा न्याय मिळेपर्यंत 'छात्रों की गुंज' वाढतच जाणार, असा इशारा राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना दिलाय...
दरम्यान राहुल गांधींचं समर्थन करत ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनीही महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरखास्त करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केलीय...तर मंत्री आशिष शेलारांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलयं...
MPSCतील पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. त्यात आयोगाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यावर आपला भर असल्याचं म्हटलंय. विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा गेलाय. विरोधकांच्या टीकेनंतर तरी एमपीएससीचा कारभार सुधारणार का? यापुढे तरी परीक्षा पारदर्शकपणे पार पडणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.