MPSC paper leak controversy takes a dramatic turn after complainant admits filing a fake allegation; investigation underway. saam tv
महाराष्ट्र

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; तक्रारच बनावट असल्याचा दावा

MPSC Food Inspector Exam Paper Leak Fake Complaint Truth: एमपीएससी अन्न व औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवा ट्विस्ट; तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचं मान्य केल्याने खळबळ. नंदुरबार कनेक्शन आणि आजच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष.

Omkar Sonawane

गणेश कवडे, साम टीव्ही

MPSC मार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेबाबत उभ्या राहिलेल्या पेपरफुटीच्या आरोपांना आता नव वळण मिळाल आहे. संबंधित तक्रारच बनावट असल्याचा दावा स्वतः तक्रारदाराने ईमेलद्वारे केल्याने या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. 22 मार्च रोजी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडली होती, तर 12 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर 1 ते 21 जुलै दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या, 22 जुलै रोजी अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 23 जुलैला २३ जुलैला एमपीएससीकडे ईमेलद्वारे पेपरफुटीची तक्रार दाखल झाली. या तक्रारीनंतर एमपीएससीने तातडीने कारवाई करत तक्रारदाराला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावण्यात आले असून आज त्यांची चौकशी होणार आहे.

दरम्यान, काल उशिरा रात्री याच तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ईमेल पाठवून धक्कादायक दावा केला. ही तक्रार बनावट होती. पुन्हा परीक्षा लवकर होणार नाही, म्हणून पेपर फुटल्याचा बनाव रचला, असे त्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणात संशयाची साखळी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, २० मार्च रोजी कथित संभाषण झाल्याचा दावा असताना त्याची तक्रार २४ जुलैपर्यंत उशिरा का करण्यात आली, याचाही तपास केला जात आहे.

नंदुरबार कनेक्शन समोर

या प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. कौटिल्य क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील यांच्यावर पेपरफुटीचे आरोप करण्यात आले होते. मालेगावमधील एका विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार देत पाटील यांनी पाच लाखांची मागणी केल्याचा दावा केला होता. मात्र प्रवीण पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, माझ्याकडून कोणताही पेपर लीक झालेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एमपीएससीच्या अन्न व औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. तक्रारदारानेच आपली तक्रार बनावट असल्याचं मान्य केल्याने या प्रकरणात मोठा गोंधळ निर्माण झालाय. नंदुरबारच्या कोचिंग क्लास संचालकांवर झालेले आरोपही फेटाळण्यात आले असून आज होणाऱ्या चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Closed: पुढील महिन्यात बँकांना १४ दिवस राहतील बंद; RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

उकडलेली चवळी खाण्याचे फायदे काय आहेत?

Ram Charan: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण रुग्णालयात दाखल; ॲक्शन सीनदरम्यान अभिनेता गंभीर जखमी

High blood pressure: बीपी किती प्रमाणात वाढला की हार्ट अटॅक येऊ शकतो?

Maharashtra News Live Update: उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये महामोर्चा; मोठ्या संख्येने बांधवांचा सहभाग

SCROLL FOR NEXT