MPSC PAPER LEAK: MINISTER NARHARI ZIRWAL’S OSD FACES ALLEGATIONS saam tv
महाराष्ट्र

MPSC पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत? झिरवळांच्या चौकशीची विरोधकांची मागणी

MPSC Paper Leak Case Narhari Zirwal OSD Allegations: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचलेत. मुख्य आरोपीचे एका मंत्र्यांच्या ओएसडीशी संबंध असल्याचं समोर आलंय. कोण आहे हा मंत्री आणि त्यांचा ओएसडी? नेमका आरोपीशी त्यांचा काय संबंध आहे?

Girish Nikam

नीट, TET आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग ..पेपर फुटींच्या या घटनांनी राज्यातलं वातावरण तापलं असतानाच MPSC पेपरफुटीचं धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोचल्याचा संशय असल्यानं खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि त्यांचे OSD गणेश देवरे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. कारण आरोपी गौरव पाटीलच्या नंदुरबारमधील घरात देवरे भाडेकरू म्हणून राहत होते, असा आरोप करत या कनेक्शनची सखोल चौकशी करावी अशी मागणी ठाकरेसेनेनं केलीय..

दरम्यान गणेश देवरेंनी आपल्यावरचे आरोप फेटाळलेत. आरोपी गौरव पाटीलचा मी भाडेकरू असणं हा निव्वळ योगायोग आहे, असा दावा त्यांनी केलाय.. MPSC मार्फत 22 मार्चला औषध निरीक्षक पदासाठी परिक्षा घेण्यात आली. मात्र या परिक्षेच्या दोन दिवसआधी 20 मार्चलाच व्हॉट्स अॅपवर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थी ऋषिकेश गांगुर्डे यानी केला. गौरव पाटील यानेही पेपर फुटल्याची तक्रार मेल द्वारे MPSCला 24 जुलैला केली होती. MPSCमधील पेपरफुटी ही सरकारी कृपेशिवाय झालेली नाही. या प्रकरणात झिरवळांना समन्स बजावून चौकशीला बोलवा, अशी मागणी राऊतांनी केलीय..

या प्रकरणात आतापर्यंत आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक केली आहे. फरार असलेली परीक्षार्थी ऋतूजा पाटील हिला नंदूरबारमधून नुकतीच अटक झाली आहे. या गंभीर प्रकरणात आरोपी गौरव पाटील आणि ऋतूजा पाटीलचा प्रेमाचा अँगलही समोर आला होता. MPSC ने ही परीक्षा रद्द केली आहे. कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागावी ? अशी स्थिती परीक्षार्थींची झाली आहे. सरकारी परीक्षा पारदर्शकपणे कधी पार पडणार ? भ्रष्ट यंत्रणेवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार का? हाच खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DJ विरोधात पुणेकर रस्त्यावर, DJ वरून राजकारण तापलं

Maharashtra News Live Update: पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

काँग्रेसने एकाचवेळी महाराष्ट्रासह ६ राज्याचे प्रभारी बदलले; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC पेपरफुटीवर राजकारण तापलं, राहुल गांधी म्हणतात, 'MPSCवर भाजपचा ताबा'

24 तासांत 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्ज आणि नापिकीचा विळखा

SCROLL FOR NEXT