Shivraj Bangar
Shivraj Bangar विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर एमपीडीएची कारवाई

विनोद जिरे

बीड - "झोपडपट्टी दादा" म्हणून वंचित बहुजन आघाडीचे माजी बीड जिल्हाध्यक्ष तथा ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांच्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मुंबईच्या (Mumbai) बेलापूर (Belapur) येथून बीड (Beed) पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची औरंगाबाद (Aurangabad) येथील हर्सूल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईसाठी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस (Beed Police) ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, साईनाथ ठोंबरे यांनी पोलीस अधिक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता. (Latest News on vanchit shivraj bangar)

मात्र आता पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून बांगर यांच्यावर करण्यात आलेल्या एमपीडीए कारवाईला विरोध होत आहे. विशेष म्हणजे ही कारवाई थांबवून मागे घेण्यात यावी म्हणत, राष्ट्रवादी, शिवसेना, युवासेना, भाजप, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांसह काही सामाजिक कार्यकर्ते देखील पुढे आले आहेत.

तर शिवराज बांगर यांच्यावर एकूण 7 गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे आणि यामुळे पोलीस निरीक्षक ठोंबरे यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला, पोलीस अधीक्षक आर.राजास्वामी यांनी तपासून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे पाठवला अन शर्मा यांनी मान्यता दिली.

दरम्यान सदर कारवाई थांबवावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव के. के. वडमारे, शिवसेनेचे नगर पालिका सभापती विनोद मुळूक, युवा सेना जिल्हाधिकारी सागर बहिर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक संगीता चव्हाण, छावा अध्यक्ष गंगाधर काळकुटे, डीपीआयचे अजिंक्य चांदणे, एएमआयएमचे शेख अमर, नगरसेविका जयश्री विधाते, लिंबागणेशच्या सरपंच निकीता गलधर यांच्यासह अनेकांनी केली आहे.

दरम्यान शिवराज बांगर यांनी वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अनेक आंदोलनं केली. पीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी पोलिसांविरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं. त्यामुळं तळागळातून आलेल्या बांगर यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? अशी चर्चा देखील बीडसह जिल्ह्यात सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

SCROLL FOR NEXT