Udayanraje Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale: पुणे- सातारा- कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा : उदयनराजे भाेसले

रेल्वे क्रॉसिंगसाठी रस्ते वाहतुक थांबवणे ही कृती अजुनही ब्रिटीश काळात असल्याची जाणिव वाटणारी आहे, त्यामुळे नागरीकांच्या हितासाठी लोणंद, पळशी, निरा, सातारा, रहिमतपूर, ताकारी येथील मुख्य रेल्वे क्रॉसिंगच्या ओव्हरब्रिजचे कामाला गती देवून ती कामे वेळेत पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे.

Siddharth Latkar

सातारा : सातारा (Satara) आणि कराड (Karad) येथून दररोज पुणे (Pune) येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या निश्चितच मोठी आहे. या मार्गावर नोकरीच्या वेळेत शटल सेवा सुरु केल्यास (mp udayanraje bhosale demands to begin pune satara karad train) रेल्वेला नवीन उत्पन्न मिळण्याबरोबरच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा शिण वाटणार नाही तसंच त्यांचा वेळही वाचेल यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी सूचना खासदार उदयनराजे भाेसले (MP Udayanraje Bhosale) यांनी रेल्वे प्रशासनास केली आहे.

पुणे रेल्वे विभागाच्या डिआरएम रेणु शर्मा यांचेसमवेत भारतीय रेल्वेच्या विभागीय मुख्यालयाच्या कार्यालयात खासदार उदयनराजे भाेसले यांनी रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेत भारतीय रेल्वे प्रशासनाशी निगडीत पुणे विभागातील सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. त्यावेळी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी रेल्वे प्रशासनास विविध सूचना केल्या.

ट्रेन नंबर १२६३० कर्नाटका संपर्क क्रांती व्हाया पुणे-सातारा (pune ) जाणाऱ्या गाडीला सातारा (satara) येथे २ मिनीटांचा थांबा हा सैन्यदलातील लोकांसाठी आवश्यक आहे. कोरोनाने इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय वाढली आहे. येथुन पुढे इंटरनेटवरच सर्व काही होणार आहे. त्यासाठी लहान स्थानकावर ऑनलाईन तिकिट सेवा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था झाली पाहीजे अशी सूचना खासदार भाेसले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT