चर्चेला उधाण : खासदार उदयनराजे दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला Saam Tv
महाराष्ट्र

चर्चेला उधाण : खासदार उदयनराजे दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा : जिल्हा बॅंकेची नुकतीच निवडणूक (District Bank Election) पार पडली आहे. त्यामुळे अजून देखील साताऱ्यात 'राजकीय रंग' बघायला मिळत आहे आणि त्यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिले असले तरी, या भेटीमधून आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणे सातारा (Satara) जिल्ह्यामध्ये उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार उदयनराजेंनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक (Lok Sabha By-Election) झाली.

हे देखील पहा-

यामध्ये उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला होता, तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) सातारा लोकसभेचे खासदार झाले होते. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी त्यांची शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम आणि जवळीक संपली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी होते. त्यावेळेस उदयनराजेंनी पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामुळे शरद पवार आणि उदयनराजे यांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे.

सध्या सातारा पालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी शरद पवार यांची घेतलेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. मध्यंतरी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांनी फलटण मधील कार्यक्रमामध्ये साताऱ्याचा खासदार निंबाळकर यांच्या सारखा असावा, असे वक्तव्य केले होते. यावरून उदयनराजेंविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याचे चित्र बघायला मिळत होते.

त्यानंतर या चुकीच्या वक्तव्यावर खासदार निंबाळकर यांनी मी माढा मतदारसंघातूनच (Madha constituency) लढणार असून साताऱ्यामधुन उदयनराजे हेच खासदारकीसाठी योग्य आहेत, असे सांगून पावसकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे स्पष्ट केले होते, तर खासदार उदयनराजे यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही, पण त्यांच्या मनाला ही गोष्ट लागली आहे.

मात्र, त्यांनी यावर कोणती देखील प्रतिक्रिया देणे टाळले होते. संसदेच्या अधिवेशनाकरिता खासदार उदयनराजे भोसले सध्या दिल्लीमध्ये मुक्कामी आहेत. आज दिल्लीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले आहेत. तसेच त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Massage Parlour Fraud : मसाजाच्या हौसेने वकिलाचे खाते झालं रिकामं, नग्न अवस्थेत व्हिडिओ काढून लुबाडलं, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Pune : पुण्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक, खंडणी प्रकरणात मोठी कारवाई

Ranapati Shivray Swari Agra: 'रणपति शिवराय- स्वारी आग्रा'; शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Chanakya Niti: नवरा-बायकोने या ३ गोष्टी लक्षात ठेवा, संसार होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT