supriya sule  saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule News: राज्य देवाच्या भरवशावर चाललंय अन् सरकार घरे फोडण्यात व्यस्त; सुप्रिया सुळेंची जोरदार टीका

'राज्य देवाच्या भरवशावर चाललंय आणि सरकार घरे फोडण्यात व्यस्त आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.

Vishal Gangurde

चेतन व्यास

Supriya Sule News:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे काल सोमवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी पवनार येथील विनोबा भावे यांचे आश्रमात भेट दिली. त्यानंतर सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देत महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर संध्याकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, राज्य सरकार जोरदार निशाणा साधला.

'राज्य देवाच्या भरवशावर चाललंय आणि सरकार घरे फोडण्यात व्यस्त आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली. (Latest Marathi News)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आज सुशिक्षित युवापिढी ही वर्ध्यात आंदोलन करत आहेत. शिक्षक आंदोलन करत आहेत. शेतकरी अडचणीत आहेत, मग या ट्रिपल इंजन सरकारमध्ये सुखी कोण आहे? ते स्वतः सुखी आहेत का हे देवालाच ठाऊक'.

'राज्यात दोनशे आमदार , तीनशे खासदार आहेत. आमच्या लोकांची कामे कधी होणार. सरकार आता पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचं यातच व्यस्त असतं. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आणि दुःख जाणून घ्यायला यांना वेळच नाही. आता ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कोणावर लावायची हे त्यांच्यासाठी महत्वाचं. आता कोणाला नोटीस पाठवू, कोणाचं घर फोडायचं यातच हे व्यस्त असतात, अशी टीका सुळे यांनी केली.

'पालकमंत्र्यांची जबादारी काय असते... आपला जिल्हा नीट चालला आहे काय, पाण्याची व्यवस्था काय आहे, सोयाबीनची अवस्था काय आहे? हे सर्व सोडून ट्रिपल इंजिन सरकारकडे वेळ आहे, अशी टीकाही सुळे यांनी केली.

'राज्य देवाच्या भरवशावर चाललंय, सरकार घरे फोडण्यात व्यस्त आहे. यांना असं वाटतं की, सरकार फक्त सत्तेसाठी असतं. सत्ता त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असते, असं आजकलच्या राज्याकर्त्यांना वाटतं, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT