Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांची नवनिर्वाचित खासदार संदीपान भूमरे आणि अशोक चव्हाण यांनी अंतरावली सराटीत येऊन भेट घेतलीय. उद्यापासून मनोज जरांगे यांची मराठवाड्यात शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. जरांगे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चाना उधाण आलंय.

दरम्यान हैदराबाद गॅझेट आणि सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या मागणीनुसार करावी, अशी मागणी जरांगे यांनी केलीय. जरांगे यांच्याशी दोन ते तीन या विषयावर विस्तृत चर्चा झाली असून आजच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी म्हणजे ८ तारखेला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. चार दिवसांचा हा दौरा असणार आहे. शिंदे समिती हैदराबाद गॅझेटबाबत पुरावे जमा करणार आहे. याबाबतची मागणी मनोज जरांगे यांनी केलीय. मराठा कुणबी असल्याचं या नोंदी ऐतिहासिक पुरावे हे सगळं हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जमा करण्यात येतील.

कुणबी आरक्षण लागू करण्यासाठी हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि सातारा संस्थानचे गॅझेट आधार घ्यावा, अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्यादृष्टीने सरकार काय काम करीत आहेत याची माहिती अशोक चव्हाण आणि संदिपान भुमरे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

SCROLL FOR NEXT