MP Balu Dhanorkar Saam Tv
महाराष्ट्र

Balu Dhonarkar: बायकाे घरी 'हिटलर'च असते; जिसको बिवी है उसे पता है! जिसे नही, उसका ठिक है!

चंद्रपुरात स्थायिक व्हावं अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी नमूद केले.

संजय तुमराम

चंद्रपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (congress mp balu dhonarkar) यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या आमदार पत्नीला हिटलरची (hitler) उपमा दिली. अर्थातच त्यांनी हे विनाेदाने म्हटलं आहे. या विनोदी टोल्यामुळे कार्यक्रमस्थळी काही मिनिट खसखस पिकली. कैद्यांच्या मनोरंजनासाठी खासदार बाळू धानोरकर (balu dhonarkar) यांनी जिल्हा कारागृहाला (jail) दोन टी.व्ही संच भेट दिले. कारागृहातील कैद्यांशी (prisoners) संवाद साधताना " चंद्रपुरात स्थायिक व्हावं अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी नमूद केले.

मी चंद्रपूरात (chandrapur) वास्तव्यास आलाे तर तुम्हाला महिन्यातून किमान एकदा भेटता येईल. तुमच्या समस्या समजून घेता येईल. मात्र हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आमची हिटलर मॅडम आम्हांला परवानगी देईल". धानोरकर यांनी "बायको (wife) घरी हिटलरच असते. ज्याची परिस्थिती त्यांनाच ठाऊक असते, असा मिश्किल टाेला हाणला.

तुम्ही इकडे आहात (कारागृहात) बरे आहात. घरी असते तर तुमचीही परिस्थिती फार वेगळी नसती. जिसको बिवी है उसको पता है. जिसको नही है, उसका ठिक है, असे धानाेरकरांनी म्हणताच एकच हशा पिकला. कारागृहात जेलर आहेत. घरी गेल्यावर जेलर नसतात. तिथले जेलर कुणी वेगळेच असतात असेही त्यांनी नमूद केले

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT