PM Narendra Modi News, Dr Amol Kolhe News saam tv
महाराष्ट्र

MP Amol Kolhe News: कांदाप्रश्नी अमोल कोल्हे आक्रमक, केंद्र सरकारलाच दिला इशारा; उद्या २ महामार्ग रोखणार

Amol Kolhe Aggressive: शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात २ महामार्ग रोखण्याचा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

रोहिदास गाडगे

Amol Kolhe on Onion Export Duty:

कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क (Onion Export Duty) आकरणीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्यासारखा निर्णय असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी (NCP MP Amol Kolhe) केंद्र सरकारवर केलाय. केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयाविरोधात अमोल कोल्हे आक्रमक झाले असून त्यांनी शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात २ महामार्ग रोखण्याचा इशारा दिलाय.

कांद्याबाबतच्या निर्णयावरून अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभा आणि चार राज्यातल्या होऊ घाललेल्या विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महागाई नियंत्रणाच्या नावाखाली मतांची बेगमी करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नावाखाली शेतक-यांचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोपही खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी केलाय.

तसंच, 'कांद्यातून दोन रुपये हाती पडतील अशा भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली असता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची स्वप्न धुळीस मिळण्याचे पाप केलंय. या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात दोन महामार्गा रोखण्याचा इशारा अमोल कोल्हेंनी दिलाय.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात अमोल कोल्हे यांनी कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र पाठवले होते. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी केली होती. यावेळी त्यांनी केंद्रचे हे धोरण शेतकरीद्रोही असल्याची टीका देखील केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

Allu Arjun: AA22xA6 मध्ये पुष्पाचा नवा अंदाज; साऊथ चित्रपटात झळकणार हॉलिवूडचा व्हिलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT