A cow runs desperately behind a vehicle carrying her newborn calf in Kolhapur, showcasing the deep bond of motherhood. saam tv
महाराष्ट्र

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ; वासरासाठी गायीनं केला गाडीचा पाठलाग

आईच्या मायेचा झरा कधीच आटत नाही, असं आपण नेहमी म्हणतो... मात्र एक गायनं आपल्या वासरासाठी कसा आकांत केलाय

Suprim Maskar

आयचं काळीज ती आयचं काळीज... मग ती आय असो नाय तर मग गाय... मायेचा झरा कधीच अटत नाय ती असती आय.... असाच एक व्हिडीओ कोल्हापुरातनं पुढं आलाय...

कोल्हापूरच्या शाहू दयानंद कॉलेजच्या मैदानावर एका गायनं वासराला जन्म दिला...वासरू तस गोंडस... नुकत्याच जन्मलेल्या वासराला गायनं मायेनं चाटायला सुरुवात केली... पण वासरू काय हालचाल करना... ही सगळ तिथं असलेल्या तरुणांनी बघितलं अन् हालचाल केली.... वासराला तात्काळ उपचार द्यायचं ठरलं अन् गाडी आली...

तरुणांनी वासराला उचललं अन् गाडीत ठेवलं... आपला पोटचा गोळा ही माणसं कुठं घेवून जात्यात याचा प्रश्न गायला पडला अन् गायनं त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली... गाडीत वासरु अन् गाडीच्या माग गाय... हाबरुन हाबरुन गाय दमली... ही दृश्य दगडाला पाझर फोडणार अन् डोळ्याच्या कडा ओल्या करणारी हाईत..

अखेर वासराला डॉक्टरचं उपचार मिळालं अन् वासरु एकदम ठणठणीत झालं. वासराला बघून गाय आनंदीत झाली अन् पुन्हा गायनं वासराला चाटायला सुरुवात केलीय...

प्लास्टिकच्या जास्त सेवनावमुळं अशक्त वासरू जन्माला आल्याचं बोललं जातंय... प्लास्टिक ही किती घातक हाय ही पुन्हा समोर येतंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT