Sangli Mother Daughter Death News Saam TV
महाराष्ट्र

Sangli News: विजेचा शॉक लागून मायलेकीचा जागीच मृत्यू; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Sangli Mother Daughter Death News: शेतात काम करण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा विद्युत तारेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील कुरळप या गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli Mother Daughter Death News: शेतात काम करण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा विद्युत तारेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील कुरळप या गावात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. वंदना विश्वास माळी (वय ४५) आणि माधुरी विश्वास माळी (वय २०) असे मयत माय लेकीचे नाव आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदना माळी या मुलीसोबत रविवारी दुपारी ४ वाजच्या दरम्यान कुरळप वशी हद्दीवरील शेतात लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी ६ वाजता ऊसाच्या शेताच्या बांधावरून घरी परतत असताना विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडलेली होती. या तारेला माधुरी हिचा चूकून स्पर्श झाला. त्यामुळे तिला जबर शॉक लागला.

मुलीला शॉक लागल्याचं कळताच आईने तिच्याकडे धाव घेतली. मात्र, तिला वाचवण्याच्या नादात आईचाही मृत्यू झाला. इतकंच नाही, तर त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्रा सुद्धा या घटनेत मृत्युमुखी पडला. आपली आई आणि बहीण अजून का घरी आली नाही, म्हणून मुलगा संजीव माळी हा त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेला.

आई आणि बहिण रस्त्यावर पडलेल्या पाहून संजीवने आरडाओरड केली. त्यांना उठवण्याच्या नादात त्याच्याही हाताला जोरदार शॉक लागला. मात्र, सुदैवाने तो घटनेतून बचावला. वंदना विश्वास माळी यांचे पती विश्वास माळी यांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाल्याने मुलगी व दोन मुलांसोबत शेतातील घरी राहत होते.

माधुरी ही BA चे शिक्षण घेत होती. आईला मदत म्हणून ती आज आईसोबत सरपण गोळा करण्यासाठी शेतात गेली होती. मात्र, विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांच्या हालगर्जी व निष्काळजी कामामुळे आज त्यांना नाहक जीव गमवावा लागला. वंदना पश्चात संजीव व सुरेश ही दोन मुले आहेत. आई व बहिणीच्या निधनाने दोन भावांचं आक्रोश पाहून उपस्थिताना अश्रू अनावर झाले होते.

ही दुर्देवी घटना घडून ही रात्री उशिरा पर्यंत विद्युत पुरवठा अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. यामुळे नागरीकातून संताप व्यक्त होत होता. शेतात असणाऱ्या विद्युत पोलच्या तारांना ठीक ठिकाणी जोड आहेत. अनेक वेळा तारा स्पार्क होऊन तारा तुटलेले आहेत. त्यांच तारांना जोडण्याचे काम सुरू होते. पावसाळ्याच्या अगोदर योग्य काम झाले असते, तर आज मायलेकीना आपला जीव गमवावा लागला नसता.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT