Monsoon 2023 SaamTv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Update: येत्या दोन दिवसात मान्सूनपूर्व पाऊस कोकणात बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

Monsoon Update : येत्या 7 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mosnoon Update: मे महिन्याच्या शेवटी सर्वांनाच मान्सूनचे वेध लागतात. यंदा तर कडाक्याचं ऊन आणि उष्णता यामुळे मान्सून कधी दाखल होणार याची वाटच लोक पाहत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे देखील आता आभाळाकडे लागले आहेत. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील दोन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस कोकणात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून येत्या दोन दिवसात कोकणात मान्सूनपूर्व पाऊस दाखल होणार आहे. येत्या 27 मेपर्यंत मान्सूनपूर्व आणि 7 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अल निनोचा प्रभाव

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे केरळमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो आणि यामुळे राज्यातही 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असेल असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

स्कायमेटचा अंदाज

तर स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सून 7 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचणार आहे. दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. या वादळामुळे मान्सूनला उशीर होण्याची शक्यता आहे. वादळाचा प्रभाव कमी होण्यास जवळपासा आठवडा जाईल. या वादळाचा अडथळा दूर झाल्यानंतर मान्सून दाखल होईल, असं अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

Politics: आणखी एका पक्षात फूट; 12 आमदारांपैकी 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SRA कार्यालयात ऑनलाइन प्रवेशाचा खोळंबा; ओटीपीसाठी नागरिकांची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT