Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon Report: जुलै महिन्यात कसा असेल पावसाचा अंदाज? राज्यातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा आजचे वेदर रिपोर्ट

IMD issues yellow alert: मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी असून, पुढील २४ तासात राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

मे महिन्यापासून राज्यात पावसाने जोर धरला. मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरू आहे. अनेक नद्या तुंडूब भरल्या असून, काही धरणं देखील ओव्हरफ्लो झाली आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर ओसरणार असल्याचं चित्र आहे. मुंबईसह ठाणे, पालघर या जवळच्या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तास संपू्र्ण राज्यासाठी कसे असणार आहे? कुठे संततधार? कुठे मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार? जाणून घेऊयात.

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आहे. दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह पालघर जिल्ह्यांत गेल्या २ दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक भागांत संततधार सुरू असून, परिसर जलमय झाला आहे. ठाणे, नवी मुंबई या दोन शहरांनाही पावसाने झोडपून काढलं. दरम्यान, मुंबईतील जवळच्या परिसरातही पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळच्या सुमारास ठाणे पूर्व, कळवा, मुंब्रा, दिवा या ठिकाणी जोरदार पाऊस बरसू शकतो. तसेच नवी मुंबईतील घणसोली, कोपरखैरणे, वाशी, बेलापूर या परिसरांतही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघरमध्येही आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पावसाला सुरूवात झाल्यापासून शेतीच्या कामांना देखील सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण भागांतही मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील. समुद्र आज जास्त खवळणार नाही, मोठ्या लाटा उसळणार नसून, मच्छीमार बांधवांना समुद्रात जाण्यास अडचण नाही. मात्र, किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर कायम, तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT