Monsoon Session : राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पदे भरणार  saam tv
महाराष्ट्र

Monsoon Session : राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पदे भरणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील 15 हजार 501 रिक्त पद भरण्यात येणार आहेत. अर्थविभागाने (Department of Finance) ही पदे भरण्यास मंजूरी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) राज्यात २०१८ पासून विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला रिक्त पदभरतीसाठी मान्यता देण्यात आली असून यात गट अ, ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून या पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. (Monsoon Session: 15 thousand 501 vacancies will be filled in various departments of the state)

गेल्या चार-पाच वर्षांपासून कोणत्याच विभागात भरती झालेली नाही. अशातच कोरोना महामारीमुळे परीक्षा न झाल्यामुळे आणि झालेल्या परीक्षांचे निकाल न लागल्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. ही बाब लक्षात घेता आज अजित पवार यांनी राज्यातील विविध विभागात 13 हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली. तसेच ही पदभरती झाल्यास सरकारच्या विविध कार्यालयातील कामकाज सोपे होईल, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दोन- तीन दिवसांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर हा मुद्दा खूप चर्चेत आला. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसरकार 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली.

गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. या पदभरतीला आता वित्त विभागाने मान्यता दिली आहे. येत्या दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची ग्वाही यावेळी अजित पवार यांनी सभागृहाला दिली. यात पदभरती प्रक्रियेत गट अ ४४१७ पदे, गट ब ८०३१ पदे आणि गट क ३०६३ पदे भरण्यात येणार आहेत.

Edited By-Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT