Maharashtra Monsoon Rain 
महाराष्ट्र

Monsoon Rain Update: विश्रांतीनंतर मान्सूनची पुन्हा गर्जना; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Rain: राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झालाय. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीय. मात्र कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय? पाहूयात.

Bharat Mohalkar

वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा गर्जना केलीय. त्यामुळेच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहू लागल्याने हवामान विभागाने राज्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय..

जुलैच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर पुढील 4 दिवसांसाठी हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट दिलाय .कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलाय..पाहूयात.

ऑरेंज अलर्ट नेमका कुठे

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड

कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक घाट

अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे... दरवर्षीप्रमाणे पावसात प्रशासकीय यंत्रणेची लक्तरं वेशीला टांगली जाऊ नयेत म्हणून यंत्रणा आधीपासूनच अलर्ट मोडवर आहेत. ज्याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी एनडीआरएफच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र अतिमुसळधार पावसामुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

SCROLL FOR NEXT