Rain Updates in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Monsoon Return Rain : मराठवाडा-विदर्भाला परतीच्या पावसाने झोडपलं; जायकवाडी धरणाचे तब्बल 18 दरवाजे उघडले

Satish Daud

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातला असून मराठवाडा आणि विदर्भाला अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुंबईसह पुण्यातही जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांना मोठा पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण तुडूंब भरलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.

आज बुधवारी सकाळी धरणाचा पाणीसाठा ९९.७८% इतका झाला आहे. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने धरणाचे १८ दरवाजे उघडून ६ हजार २८८ क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील सर्व शेतकरी आणि गावाकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले होते. पाच दिवस पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले होते. पावसाचा जोर वाढला तर विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यातही पावसाने जोरदार हजेली लावली आहे.

दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळं या धरणांमधून मुळा-मुठा तसंच पवना नदीपात्रातील विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या लोकांनी पूरस्थितीपासून सावध राहावं, असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

पुण्यातील धरणांमध्ये मोठा पाणीसाठा

पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९ टक्के, पानशेत १०० टक्के, वरसगाव १०० टक्के आणि टेमघर १०० टक्के एवढ्या क्षमतेनं भरलेले आहेत. तसंच पिंपरी-चिंचवड शहराशी संलग्न असलेले पवना धरण १०० टक्के क्षमतेनं भरलेलं आहे. त्यामुळं पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी सतर्क व दक्ष राहणं आवश्यक आहे.

लातूरमध्ये पावसामुळे दाणादाण

लातूर जिल्ह्याला देखील मंगळवारी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे लातूर आणि मुरुड या भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. घरातील वस्तू पाण्यात गेल्या असून दत्तनगर भागातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते. मध्य रात्री प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी या भागातील नागरिकांना बचाव कार्य करत मदत केली आहे. आज देखील लातूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस

मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाने चांगलाच तडाखा दिला. मंगळवारी शहापूर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडाला होता. तालुक्यातील अर्जुनाली गावात घरांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने एक चारचाकी वाहन व एक मोटारसायकल नदीपात्राताच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने कारमधील दोघांनी वेळेवर बाहेर उड्या घेतल्याने जीवितहानी टळली.

भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले

भातसा धरणात पाण्याची आवक वाढल्याने 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 23378.18 क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या धरणातून मुंबईसह, ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या शहरातील वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uterus cancer symptoms: गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष करतात महिला, शरीरात 'हे' बदल दिसेल तर वेळीच व्हा सावधान

Nandurbar News : दंगलीच्या व्हिडिओसह तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित; नंदूरबारमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : धुळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग; नागरिकांची तारांबळ

Kothimbir Vadi: कोथिंबीर वडी कुरकुरीत करण्यासाठी ही ट्रिक ट्राय करा

Sanjay Raut: '...तेव्हा खुर्चीवरून उतरण्याची तयारी सुरू झाली असेल', PM मोदींच्या दौऱ्याआधी संजय राऊतांचा टोला

SCROLL FOR NEXT