Yellow Alert Saam tv
महाराष्ट्र

Monsoon Alert : विदर्भात जोरदार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा यलो अलर्ट

Monsoon News : राज्यात यंदा मान्सूनने दमदार सुरुवात केली असून विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला आहे. पुणे-मुंबईसह अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

यंदा राज्यभरात मान्सून मे महिन्यातच दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. आज विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण, घाटमाथ्यावर मोजक्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दक्षिण पश्चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर दक्षिण गुजरात आणि दक्षिण कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पाऊस वाढला आहे.

आज रत्नागिरी, गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट तर रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा जोर वाढल्याने मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे.

काल सकाळी ८ च्या सुमारास नाशिकमध्ये २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच सोलापूर येथे पावसाची दडी कायम असल्याने राज्यातील उच्चांकी ३३.७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान यावर्षी पावसाने जोरदार एंट्री घेतल्याने पुणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबई पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साम टिव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट; नाशिक जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार

Ajit Pawar :...म्हणून विरोधकांनी मराठी भाषेचा मुद्दा काढला; अजित पवारांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Maharashtra Assembly Session : कुणाला 'ओम फट् स्वा:हा' तर कुणाला 'चायनीज बिल्ली'; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं

Mugachi Usal Recipe : मुगाची उसळ अन् बटर पाव; पावसाळ्यात जेवणाचा झणझणीत बेत

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन ८ की ९ ऑगस्टला साजरा होणार? जाणून घ्या तारिख आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT