अक्षय बडवे, पुणे
Pune News: उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैरण झाले आहेत. सर्वजण मान्सूनच्या (Monsoon 2023) प्रतीक्षेत आहेत. पण अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सून दाखल होण्याची तारीख लांबतच चालली आहे. अशामध्ये मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने (meteorological department) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून येत्या 24 ते 48 तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे 4 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र अरबी समुद्रावर तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली होती. आता मात्र मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. मान्सूनचा पुढील प्रवास मात्र वातावरणाच्या अनुकूलतेवर अवलंबून असणार आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र स्वरूप धारण केलं असून सध्या ते गोव्यापासून 860 किलोमीटर तर मुंबईपासून सुमारे 970 किलोमीटर अंतरावर घोंगावत आहे. त्याचा पुढचा प्रवास उत्तर पश्चिम असा असल्याने आपल्या किनारपट्टीला फारसा धोका पोहोचणार नाही तरी देखील या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मच्छीमारांनी समुद्रावर जाऊ नये किंवा गेले असल्यास परत यावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात बिपोरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) तयार झाल्यामुळे केरळमध्ये मान्सून उशीरा दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणूनच देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
गुरुवारपासून देशातील अनेक राज्यात उष्णता आणखी वाढणार आहे. बिहार आणि पश्चिम बंगालसह 6 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (heat wave)ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. तसंच या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.