Armed robbers in army uniforms looted 20 kg gold and ₹1.16 crore cash from SBI Bank in Karnataka’s Vijayapura, later abandoning a bag in Maharashtra’s Solapur district. Saam Tv
महाराष्ट्र

Karnataka Bank Heist: मनी हाईस्ट स्टाईल दरोडा; SBI बँकेतून 20 किलो सोनं आणि 1.16 कोटी लंपास

Vijayapura SBI Robbery: स्टेट बँक ऑफ इंडियात मनी हाईस्ट सारखा दरोडा पडलाय.. मात्र हा दरोडा कुठल्या बँकेत पडलाय... या बँकेच्या खातेदारांवर काय परिस्थिती बेतलीय? आणि दरोडेखोर कुठं पळालेत?

Omkar Sonawane

आर्मीची वर्दी...4 हत्यारबंद दरोडेखोर, नकली नंबर प्लेटची गाडी आणि अवघ्या काही मिनिटात 20 किलो सोनं आणि 1 कोटी 16 लाख रुपयांची रोकड लंपास .. मनी हाईस्ट वेब सीरीजला लाजवेल असा हा दरोडा पडलाय कर्नाटकमधील विजापूरच्या चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेवर..... एका दरोडेखोराने चक्कं मॅनेजरच्या डोक्यालाच बंदूक लावली...आणि अवघ्या काही मिनिटात दरोडेखोर पसार झाले...

मात्र कर्नाटकात घडलेल्या या दरोड्याचं महाराष्ट्राचं कनेक्शन समोर आलं जेव्हा दरोड्यात लुटलेली रक्कम थेट मंगळवेढामध्ये आढळली. लुटलेलं सोनं आणि पैशांची बॅग सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या हुलजंती गावातील एका घराच्या पत्र्यावर टाकून दरोडेखोर पळून गेले. .त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत बॅग ताब्यात घेतलीय...

दरोड्यातील 1 बॅग पोलिसांनी ताब्यात घेतलीय.. मात्र दरोडेखोरांनी पोलिसांना गुंगारा दिलाय... त्यामुळे बँकेतील सर्वसामान्य ग्राहकांचं तब्बल 20 किलो सोनं आणि पैसे लुटले गेल्यानं खातेदार मात्र चिंतेत आहेत..

मात्र कर्नाटकच्या चडचणमध्ये अत्यंत सुक्ष्म नियोजन करुन दरोडा आलाय.. त्यामुळे

काही मिनिटात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना बँकेची खडानमाहिती कुणी दिली?

दरोड्यामागे 4 दरोडेखोर आहेत की प्रोफेशनल दरोडेखोरांची टोळी? याचा शोध घेण्याची गरज आहे.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT