bribe 
महाराष्ट्र

तहसीलदाराला जामीन, वाळूतस्कराला मागितला ३० हजारांचा हप्ता

अभिजीत घोरमारे

भंडारा - कोणतीही महसूली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी 30 हजार रूपयांची लाच मागल्याप्रकरणी मोहाडीचेल तहसीलदार देवीदास बोंबुर्डे यांना अटक झाली होती. काल रविवारी त्यांना जामीन मिळाला. भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना 30 हजार रूपयाची लांच स्वीकारतांना शुक्रवारी रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्या अटकेची फाईल जिल्हा प्रशासनापर्यंत अद्यापि पोचली नसल्याने निलंबन झालेले नाही. लांच प्रकरणात एका बड्या अधिकाऱ्याच्या अटकेने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलंय.

तक्रारदार हे वाळू व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे असलेल्या 2 ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू ठेवायची असेल तर आरोपी तहसीलदार गजानन बोंबुर्डे यांनी प्रति ट्रेक्टर 15 हजारांप्रमाणे 2 ट्रॅक्टरचा 30 हजार हप्ता द्यावा लागेल. मात्र, तक्रारदार यास लांच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लांच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. Mohadi's tehsildar's bail application approved

या बाबत तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष आरोपीला 30 हजार रूपयांची लांच घेतांना रंगेहाथ पकडले. आरोपी तहसीलदार विरुद्ध लांच लुचपत प्रतिबंधित कायद्याद्वारे गुन्हा नोंद करण्यात आलाय. यानंतर आरोपी तहसीलदार यांना शुक्रवारी एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. रविवारी त्यांना भंडारा कोर्टातून जामीन देण्यात आला. भंडारा लांच लुचपत प्रतिबंधक विभागाने अद्यापि देवीदास बोंबुर्डेविरूद्ध तक्रार केल्याची फाईल जिल्हा प्रशासनापर्यंत पोचलेली नाही. ती पोहचताच आयुक्तामार्फत सरकारला पाठविल्यानंतर शासन कारवाई यावर निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. Mohadi's tehsildar's bail application approved

विशेष म्हणजे यापूर्वीही वाळू वाहतुकीतून मिळणाऱ्या मलाईपोटी अनेक अधिकाऱ्यांचा बळी गेला आहे. लाच लुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : पुणे फिरण्याचा प्लान करताय? मग 'हे' ठिकाण लिस्टमध्ये ठेवाच

Raghav Juyal : राघव जुयालने लोकप्रिय अभिनेत्रीच्या थोबाडीत मारली? पाहा व्हायरल VIDEO मागचे सत्य

Mandale to Chembur Metro : मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार; मंडाळे ते चेंबूर मेट्रो महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता | VIDEO

Teachers Salary: दीड लाख शिक्षकांचा पगार थांबणार; सुप्रीम कोर्टानंतर शिक्षण विभागाकडूनही कोंडी?

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

SCROLL FOR NEXT