दुसऱ्याला लाटेतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूस मोदीच जबाबदार; आमदार प्रणिती शिंदेचा आरोप! SaamTV
महाराष्ट्र

दुसऱ्याला लाटेतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूस मोदीच जबाबदार; आमदार प्रणिती शिंदेचा आरोप!

काँग्रेस पक्ष हा लोकशाही मध्ये विश्वास ठेवणारा पक्ष

विश्वभुषण लिमये

सोलापूर : दुसऱ्याला लाटेतील कोरोना Corona Second Wave रुग्णांच्या मृत्यूस नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे MLA Praniti Shinde यांनी केला आहे तसेच सत्ताधारी भाजपची देशात हुकुमशाही चालली असून ते अन्य कोणाचे एकायला तयार नसल्याचही त्या म्हणाल्या आज सोलापूर मध्ये सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली होती त्यावेळी शिंदे बोलत होत्या. (Modi is responsible for the death of 2nd wave corona patient - MLA Praniti Shinde alleges)

देशातील पेट्रोल-डिझेल, Petrol Diesel गॅस सिलेंडर Gas cylinder तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात आणि देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता समाजवाद तसेच लोकशाहीच्या हक्काचे रक्षण करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

2014 साली नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आप "मुझे सत्ता दिजिये, मै महंगाई यु खतम कर दुंगा" असे महागाई कमी करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत काँग्रेस काळातील पेट्रोल, डिझेल चे दर आणि आताच्या दरांमधील फरक सांगत आता महागाई गगनाला भिडली असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे Siddaram Mhetre म्हणाले.

दरम्यान सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही चालली आहे. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कुठेतरी लोकशाहीचा पाया जो आहे तो ढासळताना दिसत आहे. विरोधकांना सामान्य जनतेच्या समस्या मोदी सरकार ऐकायला तयार नाही. लॉकडॉउन Lockdown म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती तयार झाली होती. खाद्य तेलामध्ये भरमसाठ वाढ झाली. युवकांना रोजगार नाही वरून पेट्रोल , डिझेल महाग झाले. गोरगरिबांनी जगाव कसं असा प्रश्न यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT