PM Garib Kalyan Anna Yojana Saam Tv
महाराष्ट्र

PM Garib Kalyan Anna Yojana: प्रत्येक गरीबाला नाही मिळणार फुकट रेशन; गरीब कल्याण योजनेत मोदी सरकारने केला मोठा बदल

राष्ट्रीय खाद्य सुरक्षेमार्फत गरीब कल्याण योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांनाच या मार्फत मोफत अन्नधान्य पुरवले जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

PM Garib Kalyan Anna Yojana: कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी केंद्र सरकारने गरीब कल्याण योजना सुरू केली. या मार्फत सर्वच गोरगरीब व्यक्तींना मोफत अन्नधान्य पुरवले जात होते. आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक गरजू आणि गरीब व्यक्तींना मोफत रेशन मिळणार नाही. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून ही योजना बंद करण्याची चर्चा सुरू होती. मात्र कॅबीनेटमध्ये झालेल्या बैठकीत योजना बंद न करता त्यात काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षेमार्फत गरीब कल्याण योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांनाच या मार्फत मोफत अन्नधान्य पुरवले जाणार आहे. आता पर्यंत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते ते नागरीक देखील या योजनेचा लाभ घेत होते. मात्र आता अशा व्यक्तींना यातून वगळण्यात आले आहे.

या योजनेत गहू, तांदूळ आणि इतर धान्य १ रुपयांपासून ३ रुपयांपर्यंत प्रती किलो दराने दिले जात होते. आता देखील हे दर असेच राहणार आहेत. यात क्रेंद्र सरकार सर्व खर्च उचलणार आहे. कोणत्याही राज्याकडून यातील पैसे वसूल केले जाणार नाहीत. साल २०२० मध्ये ही योजना सुरू केली असून आता पर्यंत ८१.३ कोटी कुटुंबांना याचा फायदा झाला आहे.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत मोदी सरकारची गरीब कल्याण अन्न योजना सुरू आहे. यात इतरही सर्व सेवा केंद्र शासनामार्फत पुरवल्या जात आहेत. या व्यतिरिक्त क्रेंद्राकडे अन्नधान्याचे मोठे भांडार उपलब्ध आहे. एक जानेवारी २०२३ पर्यंत जवळपास १५९ मीट्रिक टन गहू आणि १०४ एलएमटी तांदूळ उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी! रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली, पाकिस्तानची बोट असण्याची शक्यता

Monday Horoscope : सावधान! वेळ आणि पैसा वाया जाणार; 5 राशींच्या लोकांची चिंता वाढवणार

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

SCROLL FOR NEXT