NDA Government Cabinet Shiv Sena: 
महाराष्ट्र

Shiv Sena: एनडीएत शिवसेना नाराज; राज्यमंत्रिपद दिल्यानं शिंदे गटात खदखद

NDA Government Cabinet Shiv Sena: शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे एनडीएतील घटकपक्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का? हाच प्रश्नय बघूया....

Bharat Jadhav

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

एनडीए सरकार स्थापन होऊन 24 तासही उलटले नाहीत, तोच एनडीएतली खदखद चव्हाट्यावर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे एनडीएतील घटकपक्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का? हाच प्रश्नय बघूया.

मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन 24 तासही उलटले नाही तोवर एनडीएतली खदखद समोर आलीय. कारण शिंदे गट हा 7 खासदार असलेला एनडीएतला चौथ्या नंबरचा सर्वात मेठा पक्ष आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेची केवळ एका राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली. मात्र एकच खासदार असलेल्या अनेक मित्र पक्षांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी मिळाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता शिंदे गटात नाराजी उफाळून आलीय.

NDAत शिंदे गट चौथ्या स्थानी

7 खासदार तरीही केवळ एकच राज्यमंत्रिपद

5 खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेटमंत्रिपद

3 खासदार असलेल्या जेडीएसला कॅबिनेटमंत्रिपद

1 खासदार असलेल्या हिंदुस्थानी अवामी मोर्चाला कॅबिनेटमंत्रिपद

उद्धव ठाकरे एनडीएसोबत असताना नेहमीच शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद दिलं जात होतं. मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये अनंत गीते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे एनडीएतून बाहेर पडण्यापूर्वी अरविंद सावंतांची याच पदावर वर्णी लागली होती. त्यामुळे साहजिकच शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कॅबिनेटची अपेक्षा होती. त्यामुळे विरोधकांना शिंदे गटाला लक्ष्य करण्यासाठी आयतं कोलित मिळालंय.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपानं महाराष्ट्रावर अन्याय केल्याची टीका आता होऊ लागलीये..48 खासदार असलेल्या महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. तर उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातला झुकतं माप देण्यात आलंय. भाजपनं महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रपक्षांवर अन्याय केल्याची टीका होतेय.एकीकडे भाजप स्वबळावर सत्तेत नाही त्यामुळे घटकपक्षांच्या दाढीला हात लावून सत्तेचा गाडा मोदी-शाहांना हाकावा लागेल. त्यामुळे आगमी काळात घटकपक्षातील खदखदी भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT