Mobile increases high blood pressure risk saam tv
महाराष्ट्र

Mobile Side Effects : मोबाईलमुळे वाढतो उच्चरक्तदाबाचा धोका, हृदयावर होतो दुष्परिणाम! संशोधनातून धक्कादायक खुलासा

Mobile increases high blood pressure risk : रात्रंदिवस डोळ्यासमोर आणि कानाला चिकटलेला मोबाईल आपल्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. कारण बहुतांश लोक फोनवर आपला अधिकाधिक वेळ घालवत आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Mobile Side Effects : मोबाईल आपल्या कामाचा जसा अविभाज्य घटक झालाय, तसाच आपल्या जगण्याचाही जणू आधारच बनलाय. पण हाच मोबाईल आपलं जगणं संकटात घेऊन जातोय. कारण आठवड्यात ४-५ तास मोबाइल वापराने उच्चरक्तदाबाचा धोका वाढून हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलंय.

रात्रंदिवस डोळ्यासमोर आणि कानाला चिकटलेला मोबाईल आपल्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. कारण बहुतांश लोक फोनवर आपला अधिकाधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे जेवढे जास्त मोबाइलवरून बोलाल तेवढा जास्त धोका तुमच्या आरोग्याला होऊ शकतो हे एका सर्वेक्षणातून समोर आलंय.

२ लाख लोकांच्या डेटा विश्लेषणानंतरचा हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आठवड्यात मोबाइलचा चार ते सहा तासांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यामुळे उच्चरक्तदाब आणि मानसिक तणाव असे आजार उद्भवू शकतात.

चीनमध्ये अलीकडेच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. त्यानुसार मोबाइलवर संभाषणाचा कालावधी वाढल्यास आजाराचा धोकाही वाढतो. मग भलेही युजर हँड्स-फ्री सेटअप वापर असेल. मोबाइलचा वापर करणाऱ्यांना मोबाइल वापर नसलेल्यांच्या तुलनेत उच्चरक्तदाबाची जोखीम जास्त आहे.

संशोधनात काय निरिक्षण नोंदवण्यात आले?

- मोबाइलवर संभाषणाचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेवढे जास्त संभाषण तितकी जास्त जोखीम वाढते.

- ब्रिटिश नागरिकांच्या जीनसंबंधी व इतर आरोग्यविषयक माहितीचे यूके बायो बँकमधील डेटाचे विश्लेषण यात केले आहे. त्यात ३० पेक्षा जास्त वयाच्या २.१२ लाख लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले.

- यात सहभागी लोकांच्या आरोग्यावर १२ वर्षे निगराणी ठेवण्यात आली. आठवड्याला ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त मोबाइलवर बोलणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो असे निरिक्षण नोंदवण्यात आले.

- मोबाइलवर कमी बोलणाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. कारण संभाषणाचा कालावधीबरोबरच जोखमीही वाढते.

- आठवड्यात ३० ते ५९ मिनिटे फोनवर बोलणाऱ्यांमध्ये हा धोका दिसून आला आहे. याचही आठवड्यातून १ ते ३ तासां बोलणाऱ्यांमध्ये १३ टक्के, ४ ते ६ तासांसाठी १६ टक्के आणि ६ तासांहून जास्त वेळ फोनवर पोलणाऱ्यांमध्ये हा धोका २५ टक्क्यांनी वाढतो.

- याशिवाय आनुवांशिकदृष्ट्या उच्चरक्तदाबाची जोखीम असलेल्या लोकांमध्ये आठवड्यात ३० मिनिटांहून कमी संभाषण ठेवल्यास जोखीम ३३ टक्के कमी होऊ शकते.

अर्ध्या तासाहून कमी वेळ वापर केल्यास धोका कमी

आठवड्यात मोबाइल संभाषण अर्ध्या तासाहून कमी वेळ केल्यास हा धोका कमी होतो. मोबाइल कमी स्तरावरील रेडिओफ्रिक्वेन्सी एनर्जीचे उत्सर्जन करतात. या अभ्यास प्रकल्पात त्याचा संबंध रक्तदाबाशी लावण्यात आला आहे. फोनमधील इलेक्ट्रॉमॅग्नेटिक फील्ड त्यास कारणीभूत असल्याचे मानले जाते. त्याचा ब्रेन ट्यूमरशी संबंध असल्याचे मानले जाते. (Breaking Marathi News)

त्यामुळे कामापुरता मोबाईलचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर मोबाईलचा वापर जास्त करण्याऐवजी तो कसा कमी करता येईल याचा विचार करायला हवा. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT