minor girl commits suicide In Sangamner, Ahmadnagar Saam Tv
महाराष्ट्र

मोबाईलचा अतिरेक! वडील अभ्यासावरुन रागावले; अल्पवयीन मुलीची नदीपात्रात आत्महत्या

Ahmadnagar Latest News: कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला. त्याच मोबाईलवर (Mobile) मुलगी सतत व्यस्त दिसू लागल्याने वडील रागवले.

गोविंद साळुंके

अहमदनगर: वडिलांनी मुलीला दिलेला मोबाईल सारखा घेऊन बसते त्यामध्ये नेहमी व्यस्त असते, अभ्यासाकडे लक्ष दे असं म्हणत वडिलांनी मुलीची कानउघडणी केली. मात्र हे सहन न झाल्याने पंधरा वर्षे अल्पवयीन (A Minor Girl) विद्यार्थिनीने जवळच असलेल्या मुळा नदी पात्रामध्ये रात्रीच्या वेळी पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घारगाव येथे घडली आहे. (mobile addicted minor girl commits suicide because her father shouts her to study)

हे देखील पहा -

अक्षदा वाघ वय 15 वर्ष असं मृत झालेल्या मुलीचं नाव असून ती इयत्ता 9 मध्ये शिक्षण घेत होती. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने वडील मोलमजुरी करतात त्यातूनच पैसे साठवून कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला. त्याच मोबाईलवर (Mobile) मुलगी सतत व्यस्त दिसू लागल्याने वडील रागवले. याचा राग मनात धरून रात्री ती अकराच्या दरम्यान कोणालाही न सांगता ती घराबाहेर पडली. परिसरात रात्रभर नातेवाईकांसोबत मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. सकाळी काही नागरिकांना मुळा नदी पात्रात पाण्यामध्ये मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनास्थळी घारगाव पोलीस दाखल होत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident: भीषण अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाखाली कोसळली

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं ८६ व्या वर्षी निधन

Maharashtra Live News Update: : जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस

Vastu Tips For Water: किचनमध्ये 'या' दिशेला ठेवा पाण्याचे भांडे, रात्रीतून बदलेल तुमचं नशीब

Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT