Mob Attacks BJP District Vice President saam TV Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या नेत्यावर अहिल्यानगरमध्ये जमावाचा जीवघेणा हल्ला; १०० जणांवर गुन्हा दाखल

BJP Leader Rushikesh Shete : अहिल्यानगरच्या नेवासा येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी १०० जणांवर गुन्हा दाखल करत ७ जणांना ताब्यात घेतले असून परिसरात शांततेचे आवाहन केले आहे.

Namdeo Kumbhar

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी घडली. ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मागणी शेटे यांनी केली होती. याच रागातून अतिक्रमण हटाव पथकासोबत वाद झाल्यानंतर, गणपती मंदिर परिसरातून जाणाऱ्या ऋषिकेश शेटे यांच्यावर फळविक्रेते व जमावाने चाकूने वार करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

घटनेच्या वेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून जमावाचा प्रतिकार केल्यामुळे ऋषिकेश शेटे या हल्ल्यातून बचावले आहेत. या हिंसक घटनेप्रकरणी पोलिसांनी रात्रीच ९० ते १०० जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केला असून ७ जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

नेवासा येथे फेरीवाल्यांवरील कारवाईदरम्यान गोंधळ; गाडीची तोडफोड, ७ जण पोलिसांच्या ताब्यात

नगरपंचायतीच्या पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई सुरू होती. त्यावेळी काही फेरीवाल्यांनी त्याला तीव्र विरोध केला. या कारवाईदरम्यान ऋषिकेश शेटे यांची गाडी पथकाच्या मागाहून जात होती. त्यामुळे उपस्थितांमध्ये गैरसमज पसरला. या गैरसमजातून काही नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी शेटे यांच्या गाडीची तोडफोड केली.

घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले असून तक्रार नोंदवण्याची व पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, "कोणीही कायदा हातात घेऊ नये, परिसरात शांतता ठेवावी. काही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा; दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधून दरे गावाकडे रवाना

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

Tomato Storage Tips: टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवायचा की बाहेर? ताजा आणि चांगला ठेवण्यासाठी जाणून घ्या ७ सोपे उपाय

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT