Lek Ladki Yojana 2026: लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपये; जाणून घ्या पात्रता आणि कागदपत्रे

Shruti Vilas Kadam

मुंबईतील ३,५६३ लाभार्थींना मिळणार लाभ

‘लेक लाडकी योजने’अंतर्गत मुंबई शहरातील ६७१ आणि मुंबई उपनगरातील २,८९२ अशा एकूण ३,५६३ लाभार्थींना आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

lek Ladki Yojana 2026 | Social Media

कोणत्या मुलींना योजनेचा लाभ मिळतो?

१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

lek Ladki Yojana 2026 | Social Media

उत्पन्न आणि शिधापत्रिकेची अट

ही योजना पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांसाठी लागू आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

lek Ladki Yojana 2026 | Social Media

एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ

मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६ हजार, सहावीत ७ हजार आणि अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८ हजार रुपये दिले जातात. १८ वर्षांनंतर ७५ हजार रुपये अंतिम लाभ मिळतो.

lek Ladki Yojana 2026

१८ वर्षपूर्ण असणे गरजेचे

मुलीने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असणे आणि ती अविवाहित असणे आवश्यक आहे. अंतिम लाभासाठी संबंधित स्वयंघोषणापत्र सादर करावे लागते.

lek Ladki Yojana 2026

अर्ज कुठे करायचा?

पात्र मुलीच्या पालकांनी जन्मनोंदणी आणि जन्मदाखल्यासह आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा. कागदपत्रांची पडताळणी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविकेमार्फत केली जाते.

lek Ladki Yojana 2026

अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

मुलीचा जन्मदाखला, पालक व मुलीचे आधार कार्ड, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि संबंधित टप्प्याचा शाळेचा बोनाफाईड दाखला आवश्यक आहे. गरजेनुसार कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रेही द्यावी लागतात.

lek Ladki Yojana 2026

Skin Care: फक्त १ महिना रोज प्या हे टेस्टी ड्रिंक; पिंपल्स डाग डार्क सर्कल्स सगळे प्रॉब्लेम होतील कायमचे दूर

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा