Mns Worker Protest Kalyan Dombivli Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

KDMC News: कल्याण-डोंबिवली महापालिकेला सुतासारखं सरळ करू; मनसेचा इशारा

Mns Protest : पंधरा दिवसात आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर जिलेबी सारख्या गोल गोल असलेल्या पालिका प्रशासनाला सुतासारखं सरळ करू, असा इशान मनसेने दिलाय. आज कल्याण-डोंबिवली महापालिकेवर नागरी समस्यां सोडवण्याविषयी मोर्चा काढण्यात आला होता.

Bharat Jadhav

(अभिजीत देशमुख, कल्याण)

Mns Worker Protest Kalyan Dombivli Municipal Corporation:

दूषित पाणीपुरवठा,अधिकृत नळ जोडणे, उद्यानांची दुरावस्था,अशा नागरी समस्यांबाबत आज मनसेने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान मनसेच्या मंडळाने मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Latest News)

येत्या १५ दिवसात जर पालिकेने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही, तर त्यानंतर जिलेबी सारख्या गोलगोल असलेल्या प्रशासनाला मनसे सुतासारखे सरळ करेल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिलाय. मनसे कल्याण शहर शाखेतर्फे मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार (Former MLa) आणि शहराध्यक्ष प्रकाश भोईर महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विविध नागरी समस्यांबाबत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका (Municipal Corporation) आयुक्त इंदू राणी जाखड यांची भेट घेतली. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याणजवळ टिटवाळा,मांडा, बल्यानी भागात होणारा दूषित पाणीपुरवठा, ग्रामीण भागात अधिकृत पाणी जोडणी, पाण्याचे बिल नागरिकांना वेळेवर देणे, उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवणे, स्मशानभूमीत मोफत लाकडं पुरवणे, मंजूर झालेल्या जलकुंभाची काम त्वरित सुरू करणे, रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करणे, काळा तलाव आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, दुर्गाडीचे टिटवाळा रिंग रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे अशा मागण्या महापालिका आयुक्तांकडे मनसेकडून करण्यात आल्या.

यावेळी महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या बैठकीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील ८ दिवसात जर या आश्वासनाचे अंमलबजावणी झाली नाही. तर झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला तसेच जिलेबीसारखं गोड बोल असलेल्या प्रशासनाला सुता सारखं सरळ करून असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT