cm eknath shinde uddhav thackeray and raj thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेसाठी हिदुत्ववादी पक्षांना मुस्लिमप्रेम? नितेश राणेंच्या भूमिकेचा महायुतीला धसका?

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

उद्धव ठाकरे मविआसोबत गेल्यानंतर आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सॉफ्ट केल्याचं लपून राहीलं नाही. त्यावरून ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाकडून नेहमीच सुरु असते. एवढंच नव्हे तर लोकसभेला ठाकरेंच्या पक्षाला मुस्लिमांची मतं मिळाली, असा आरोपही भाजप आणि शिंदे गटानं केला.

मात्र आता विधानसभेच्या तोंडावर हिंदुत्ववादी शिंदे गट आणि मनसेनं थेट मुस्लिमांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं उघड झालं. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांनी मुस्लिम महिलांना बुरखे वाटले. तर दुसरीकडे हिंदू जननायक असं बिरुदावली मिरवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांनी मुस्लिमांसाठी अजमेर यात्रेचं आयोजन केलं.

उद्धव ठाकरे गटानं विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे की काय आता महायुतीतल्या पक्षांनी चांगलाच धसका घेतल्य़ाची चर्चा रंगलीय. आणि म्हणूनच मतांसाठी भूमिका बदलल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलीय. तर ठाकरे गटाच्या भुमिकेवर एमआयएमचे नेते इम्तियाज जलीलांनीही टीका केलीय..

यातच एकीकडे महायुतीत नितेश राणे आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे महायुतीचे नेते चिंतेत आहेत. मुस्लीम बहुल मतदारसंघांमध्ये फटका बसण्याची भीती महायुतीतल्या शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आहे. लोकसभेसारखा विधानसभेतही मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका बसू नये यासाठीच बुरखा वाटप आणि अजमेर यात्रेच्या आयोजनाची चर्चा आहे. मात्र याचा किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News : पाण्याच्या जारचा धक्का लागल्याने दोन मुलांना मारहाण; १६ जणांवर गुन्हा दाखल

Amitab Bachchan: "मराठी शब्द चुकीचा बोललो..." अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, Video पाहा

Maharashtra News Live Updates: आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर

Vijaydurg Fort : पाण्याचा वेढा असलेला नयनरम्य विजयदुर्ग किल्ला

One Nation, One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'वरून सत्ताधारी विरोधकांत जुंपली

SCROLL FOR NEXT