Sambhajiraje Chhatrapati And mns mla raju patil saam tv
महाराष्ट्र

"सर्वच पक्षांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचे पुण्य करावे"

शिवसेनेनं संभाजीराजे छत्रपतींना डावलून राज्यसभेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी (Sambhajiraje Chhatrapati) संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची तुफान चर्चा सुरु आहे. शिवसेनेनं (Shivsena ) संभाजीराजेंना डावलत राज्यसभेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनीही ट्विटरच्या माध्यामातून प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारण केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी सर्व पक्षांना ट्विटरवरून केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेकडूनही संभाजीराजे छत्रपतींना पुरस्कृत उमेदवारी देण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश करावा, अशी अटही शिवसेनेने ठेवली होती. मात्र, संभाजीराजेंनी शिवसेना पक्षप्रेवशाचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर संभाजीराजे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.

"शिवसेनेनं कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे."

भाजप नेते आशिष शेलार हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील भाजपच्या मार्गदर्शन कार्यक्रमात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलतना त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर भाष्य केलं. शेलार म्हणाले,'शिवसेनेनं कोणाला उमेदवारी द्यावी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. मुद्दा आहे की संभाजीराजे छत्रपती यांना जेव्हा सन्मानाने देण्याची वेळ येते तेव्हा शिवसेनेचा हात आखडता का होतो.स्वपक्षाच्या विचारांसाठी संकुचित का होतो,तसंच हात आखडता घेतला, त्यांनी संकुचितता दाखवली हा काही छत्रपतींचा आदर केलाय असं मी मानत नाही'.

दरम्यान, आशिष शेलार यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली होती. 'ओबीसी आरक्षण मिळूच नये, हीच भावना महविकास आघाडीची आहे. मध्य प्रदेशने पाठपुरावा केला,कायदेशीर सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. मध्य प्रदेशने जे केलं ते करताना ठाकरे सरकारचे हात शिवले होते का ?, असा सवाल शेलार यांनी ठाकरे सरकारला केला. ओबीसी आरक्षणावरून आमचा मोर्चा हा जन आक्रोश आहे.या आक्रोशाचा प्रतिबिंब म्हणजे हा मोर्चा होता.आम्ही हा संघर्ष दुप्पट करू, असंही आशिष शेलार म्हणाले होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT