Raju Patil  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News:...तर फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना ठोकू; मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

Raju Patil News: ...तर फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना ठोकू, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

MNS Raju Patil News:

'फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करून देखील मुजोरी थांबत नाही, कारण अधिकाऱ्यांचे हप्ते आहेत. कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा इथून पुढे फेरीवाल्यांना नाही तर फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना ठोकू, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

परप्रांतीय फेरीवाला, मराठी तरुण वाद प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजू पाटील म्हणाले, 'मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केला, पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. त्याबद्दल आम्ही आलो नाही, पण अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातही कायदेशीर कारवाई करा, अशी आमची मागणी आहे'.

'तसेच स्टेशन परिसरातील गर्दुल्ले , वारांगना यांच्यावर देखील कारवाई करा, अशी देखील सूचना दिली. यावेळी आमदार पाटील यांनी दबावापोटी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप केला.

'केडीएमसीला भीक लागली आहे, आम्ही स्टेशनच्या बाहेर भीक मागायला बसू आणि कॅमेरा लावून देऊ, असा टोला देखील आमदार पाटील यांनी यावेळी लगावला.

राजू पाटील यांची नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

'कल्याण डोंबिवलीत २५ वर्ष सत्ता भोगली, त्यांनी काही केलं नाही, आपल्या नावापुढे डॉक्टर लावणारे इथं खासदार आहेत, आयुक्त आहेत. मात्र त्यांना आरोग्य सुविधांची जाण नाही. लोकांना स्वस्तात आरोग्य सुविधा मिळू शकतात. मात्र तसं न करता जागा पदरात पाडायची. यातून लोकांना सोयी सुविधा देतोय असे भासवायचे. मुंबईत कोव्हिड घोटाळा झाला,तसा कल्याण डोंबिवलीतही झाला आहे, असा आरोप राजू पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT