Raju Patil News Saam tv
महाराष्ट्र

Raju Patil News: 'तुम्ही इकडे या, नाही आले तर...'; नित्कृष्ट दर्जाचे काम पाहताच राजू पाटील संतापले

Raju patil latest news: मनसे आमदार राजू पाटील हे महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Raju Patil News: 'तुम्ही इकडे या, नाही आले तर मारेन ...अशा पद्धतीने आमच्याकडे चाळ पण बांधत नाही. तुम्ही तरी पाण्याच्या टाक्या बांधतायेत, अशी तंबी मनसे आमदार राजू पाटील यांनी संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना दिली. कल्याण ग्रामीण भागात अमृत योजनेअतंर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम नित्कृष्ट दर्जाचे सांगत मनसे आमदार राजू पाटील हे महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. (Latest Marathi News)

आमदार राजू पाटील पाण्याच्या टाकीचं बांधकाम पाहण्यास आले होते. कामाच्या पाहणीदरम्यान त्यांनी इंजिनीयरला कामाची पाहणी करण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, इंजियर जवळ न आल्याने आमदारांनी त्यांना मारण्याची धमकी दिली. पाण्याच्या टाकीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

कल्याण ग्रामीण भागातील २७ गाव परिसरामध्ये नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागतेय. या भागातील पाणीटंचाई समस्या दूर करण्याकरता अमृत योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या उभारणे,जलवाहिन्या टाकणे अशा कामांना सुरुवात करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून २७ गाव भागात ही काम सुरू आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या टाकीचा काही भाग कोसळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी डोंबिवली जवळील भोपर गावात घडली होती . काम पूर्ण झालेले नसताना ही घटना घडल्याने या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

सुदैवाने यावेळी परिसरात कुणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आज काटई गावातील पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली. कामाचा दर्जा पाहून आमदार मनसे आमदार राजू पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मनसे आमदार राजू पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT