raju Patil and nitin gadkari
raju Patil and nitin gadkari  saam tv
महाराष्ट्र

रस्त्यांच्या दुरवस्थेवरून मनसे आक्रमक ; आमदार राजू पाटलांनी नितीन गडकरींकडे केली 'ही' मागणी

प्रदीप भणगे

Dombivali News : आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी यांच्या या निर्णयानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून त्यांचे लक्ष वेधले आहे.

डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, आमदार राजू पाटील यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि आधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा, अशी मागणी ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी आज, बुधवारी रस्त्याच्या दुरवस्थेवरून पुन्हा एक ट्विट केलं आहे. आज केलेले हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि आधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे हे ट्विट आता चर्चेत आले आहे.

गणेशोत्सव सुरू होऊन आता ७ दिवस उलटून गेले आहे.तरी कल्याण,डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत.याच खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.याच परिस्थितीवरून डोंबिवली श्रीकांत देव या गणेश भक्ताने चक्क आपल्या लाडक्या बाप्पासाठी देखावा तयार केला. यात बाप्पा होडीत विराजमान असून वर्षांनुवर्षे कायम असलेले दोन प्रश्न,समस्या देखाव्यात सादर केल्या आहेत.

डोंबिवलीकरांना भेडसवणाऱ्या महत्वाच्या समस्या म्हणजे लोकलमधील गर्दी आणि रस्त्यावरील खड्डे या विषयावरून बाप्पाचे आणि उंदीर मामाचे संभाषण देखाव्यात सादर केले होते.तर आता मनसे आमदार यांनी ट्विट करत रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांचे ट्विट आता चर्चेत आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानानंतर गुन्हेगारी वाढली; कोयता गँगकडून एकाची हत्या

Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

Swati Maliwal Assult Case: स्वाती मालीवाल प्रकरण नेमकं काय, एफआयआरमध्ये नेमके कोणते आरोप केले?

Sangli News : कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना आक्रमक; सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले

Anil Deshmukh News : शरद पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT