मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून मिरारोड-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. पोलिसांनी या मोर्च्याला परवानगी नाकारल्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात कलम १४४ लागू करत जमावबंदीचा आदेश जारी केला होता. मात्र, सकाळी १० वाजता मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलक रस्त्यावर आल्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली.
यादरम्यान, रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या काही गुजराती आणि मारवाडी नागरिकांनी मराठी आंदोलकांना उद्देशून चिडवले, अशी माहिती काही आंदोलकांनी दिली. त्यामुळे वातावरण अधिक चिघळलं.
मीरा भाईंदरमध्ये मनसे, ठाकरे सेना आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चांचं आयोजन केलंय. बालाजी हॉटेलच्या परिसरात मराठी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले. यावेळी त्यांनी घोषणाबाजीही केली. दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक आंदोलनात उपस्थित होताच आंदोलनकर्त्यांनी '५० खोके एकदम ओकेची घोषणा केली'. यावर प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आंदोलनात संतप्त प्रकार घडला.
पोलिसांची धरपकड सुरू असताना रस्त्याच्या कडेला अनेक गुजराती आणि मारवाडी लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, काही मराठी आंदोलकांनी गुजराती आणि मारवाडी लोकांमधील संभाषण ऐकलं. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, 'पोलीस मराठी आंदोलकांना पकडत होते. पोलिसांची धरपकड सुरू असताना काही गुजराती आणि मारवाडी लोक तेथे पोहोचले. ते पोलिसांना सांगत होते, "यांना असंच पळवा. यांना अजिबात एकत्र येऊ देऊ नका.. मीरा भाईंदरमध्ये यांचं आम्ही चालू देणार नाही" असं ते म्हणत होते. मी सगळं ऐकलंय' असं उपस्थित महिला म्हणाली.
महिलेने यावेळी पोलिसांना अनेक प्रश्न उपस्थित केले, 'आम्हाला मोर्चा करण्याची परवानगी का नाही. आम्हाला बोलायची परवानगी का नाही.. अमराठी लोकांचा जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा यांची कायदा सुव्यवस्था कुठे होती? त्यांना मोर्चा काढायला का दिला?' असे अनेक सवाल महिलेनं उपस्थित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.