Raj Thackeray Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: शरद पवारांच्या भूमिकेने राजकारण तापले! अदानी प्रकरणात यु-टर्न, राष्ट्रवादी भाजपची बी टीम? मनसेचा खोचक टोला

MNS vs NCP: मनसेनेही राष्ट्रवादीला डिवचत भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला आहे.

Rashmi Puranik

Sandeep Deshpande Tweet: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी अदानी प्रकरणावरुन मोदी सरकारला घेरले असतानाच शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्येच फूट पडल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. याच प्रकरणावरुन मनसेनेही राष्ट्रवादीला डिवचत भाजपची बी टीम असल्याचा टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

काय आहे संपूर्ण प्रकरण..

कॉंग्रेससह (Congress) प्रमुख विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी केली होती. मात्र शरद पवारांनी मात्र या मागणीला विरोध दर्शवला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून शरद पवारांनी एकप्रकारे गौतम अदाणी यांचं समर्थन केल्याचं दिसत आहे. पवार यांनी संयुक्त संसदीय समितीऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत अदानी प्रकरणी चौकशी करावी, असे विधान केले होते.

तसेच हिंडेबनर्ग रिपोर्टवरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले होते. "त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हतं. अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं," असे म्हणत शरद पवारांनी कॉंग्रेसच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन आता मनसेकडूनही (MNS) राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून काम पाहत आहे का? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांचे ट्विट...

"अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला यु टर्न म्हणजे राष्ट्रवादी भाजप नी लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहे का? की दुसऱ्यांना भाजपची बी टीम आहे असे आरोप करणारे स्वतःच बी टीम झाले आहेत ???, असे खोचक ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी विरोधी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. "शरद पवार यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्याबाबत वेगळी भूमिका घेतली म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येफूट पडणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

SCROLL FOR NEXT