Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : ...तर देवेंद्र फडणवीसांची हत्तीवरुन मिरवणुक काढू; मनसे नेत्याची घाेषणा

आगामी काळात ठाेस भूमिका घेण्याबाबत चर्चाही झाली.

भारत नागणे

Devendra Fadnavis News : पंढरपुरातील घरदार उध्वस्त न करता कॅारिडाॅर केल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढू अशी घाेषणा मनसे नेते दिलीप धाेत्रे यांनी नुकतीच पंढरपूरात (pandharpur) केली. यामुळे पंढरपुर काॅरिडाॅरबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. (Maharashtra News)

पंढरपूर काॅरिडाॅर (pandharpur corridor) करताना कोणाचीही घर, दार आणि मंदिरी न पाडता पंढरपूरचा विकास करू असे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावर मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

दरम्यान कोणाचीही घर दार न पाडता काॅरिडाॅर केला‌ तर देवेंद्र फडणवीस यांची हत्तीवरून पंढरपूर शहरातून मिरवणूक काढू अशी घोषणा मनसेचे (mns) नेते दिलीप धोत्रे यांनी‌ केली आहे. या बैठकीत याबाबतचा ठराव झाला.तसेच पंढरपूर कॉरिडोर बाबत देखील विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच कॉरिडॉरमध्ये लोकांची घरदार वाचवण्यासाठी आगामी काळात कुठली भूमिका असावी याबाबतही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT