BJP Refused MNS Invitation Saam Tv
महाराष्ट्र

MNS: ठाकरे बंधुंचं मनोमिलन भाजपला रुचेना; मनसेच्या प्रतिसभागृहात सहभागी होण्यास नकार

BJP Refused MNS Invitation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आलेलं आमंत्रण भाजपने नाकारलंय. मनसेने आदित्य ठाकरेंना निमंत्रण दिल्याने भाजप नेते नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे.

Bharat Jadhav

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील राजकारण ३६० अंशांनी फिरेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या निर्णयाचे स्वागत केलंय. पण ठाकरे बंधुंचे मनोमिलन भाजपला मात्र रुचताना दिसत नाहीये. आता अशी चर्चा घडण्यामागे कारण आहे. मनसेनं दिलेलं आमंत्रण भाजपनं नाकारलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भाजपकडून नाकारण्यात आलंय.

भाजपच्या नेत्यांनी निमंत्रण दिल्याचे आभार मानले, पण कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती त्यांनी पत्राद्वारे कळवलीय. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाकेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी साद दिली. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी उलटफेर होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

त्यात आता मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रतिसभागृहात सहभागी होण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना आमंत्रण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंना आमंत्रण देणं भाजपला रुचलं नाहीये. आदित्य ठाकरे यांना या प्रतिसभागृहासाठी आमंत्रित केल्याने भाजप नेते नाराज झालेत. प्रतिसभागृहात सहभागी होण्यास नकार दिल्याचा दावा काही केला जात आहे.

त्यामुळे दोन्ही भावांचं एकत्र येणं भाजपला आवडत नसल्याचं दिसत आहे. काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने पालिकेचे सभागृहाच भरलेले नाही. त्यामुळे लोकांच्या अनेक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष नाहीये. त्यामुळे मनसेने महापालिकेच्या धर्तीवर प्रतिसभागृह आयोजित करण्याची घोषणा केली होती.

यासाठी राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना संदीप देशपांडे यांनी निमंत्रण दिलं होतं. यात आदित्य ठाकरे, भाजपाचे आशिष शेलार, मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे, समाजवादी पक्षाचे रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राखी जाधव, आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. परंतु भाजपच्या नेत्यांनी मात्र मनसेचं आमंत्रण नाकारलंय.

एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये दुरावा निर्माण होताना दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी मनसेचं आमंत्रण नाकारल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगलीय.प्रतिसभेसाठी येता येणार नसल्याची माहिती भाजपकडून पत्रद्वारे कळवण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT