पालघरच्या आरोग्य अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी रुपेश पाटील
महाराष्ट्र

पालघरच्या आरोग्य अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत खंदारे यांच्यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली असून त्यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर - पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीसाठी नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशातच, जिल्ह्यात असलेल्या लसीचा तुटवड्यामुळे अनेकांना लस देखील वेळेत मिळत नाही.

हे देखील पहा -

पालघरचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी हे आपल्या कार्यालयातच लसीकरण करत असून हे नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा आरोप सदर प्रकार उघड करणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या आरोपा नंतर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत खंदारे यांच्यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली असून त्यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

मात्र ही कारवाई पुरेशी नसल्याचे सांगत त्यांच निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देखील देण्यात आले असून कठोर कारवाई न केल्यास येत्या काही दिवसात मनसे आपल्या स्टाइलने आंदोलन करेल असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT