Raj Thackeray saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Raj Thackeray : ठाकरे गट शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे. याचदरम्यान राज ठाकरेंनी मनसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Bharat Jadhav

मराठी माणसासाठी राजकारण करणारे ठाकरे गट शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी राज आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र येणार आहेत. जवळपास १९ वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर सर्व शक्तीनिशी एकत्र येत आहेत. दरम्यान ही सुरुवात आहे. असं म्हणत ठाकरे बंधूनी पाच जुलैच्या मेळाव्यासाठी दुसरं जाहीर निमंत्रण मराठी बांधवांना दिलय. त्याआधी राज ठाकरेंनी महाराष्ट्र् नविनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश दिलाय.

हिंदीसक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातून उमटलेले पडसाद उमटले. ही बाब लक्षात अगामी महापालिका निवडणुकीत जनमत आपल्या विरोधात जाईल, यामुळे सरकारमधील पक्षांनी शासन अध्यादेश रद्द केला. त्यानंतर शासनविरोधातील मोर्चा रद्द करून मराठी माणसांच्या जल्लोष मेळाव्याचे आयोजन मनसे आणि शिवसेनेने केलंय.

येत्या ५ तारखेला सकाळी १० वाजता वरळीतील एनएससीआय डोममध्ये भव्य मेळावा होणार आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. त्याआधी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचा आदेश दिलाय. सभेला कोणत्याही पक्षाचे लेबल लागू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

राज ठाकरेंकडून प्रत्येक मनसैनिकांना आदेश

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ५ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याला आपण पक्षाचा झेंडा, स्कार्फ, बिल्ला, पक्षचिन्ह असलेले प्लाकार्ड तसेच फलक, बॅनर किंवा होर्डिंग, किंवा झेंडा लावू नये. प्रभागात लावण्यात आलेल्या फलकांवरही पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरू नये. दिलेल्या सूचनांचे आपण पालन करावं. या मेळाव्याला कोणताही झेंडा नको फक्त मराठीचा अजेंडा असू द्या असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या आहेत.

मराठी माणसांच्या हितासाठी आमच्यातले क्षुल्लक आणि किरकोळ वाद संपवायला तयार आहोत, असे विधान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी करून उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत संकेत दिले होते. त्यानंतर आता मेळाव्याच्या दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेवरून दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय.

काय म्हणाले बाळा नांदगांवकर

बाळा नांदगावकर यांनीही युतीतबाबत भाष्य केलंय. साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरुन प्रश्न करण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, 'ठाकरे बंधूंपासून सगळ्यांनी एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे. मराठी संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या या दोन्ही संघटना आहेत. मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे. मराठी माणूस भविष्यात एकत्र राहिला पाहिजे', असं मत नांदगावकर यांनी मांडलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

Online Food Delivery : ऐन सणासुदीच्या हंगामात महागाईची फोडणी; ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महागणार?

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : भरतीच्या अडथळ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब|VIDEO

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार जपून करावे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

KDMC च्या प्रसुतीगृहात १ दिवसाच्या बाळाचा मृत्यू; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जी केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT