Raj Thackeray
Raj Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Raj Thackeray On Rs 2000 note withdrawn: नोटबंदीच्या निर्णयावरून राज ठाकरे नाशकात कडाडले; म्हणाले, कोणतंही पूर्वनियोजन ...'

Vishal Gangurde

Raj Thackeray News: २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे . 'नोटबंदी करतानकोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? असा सवाल राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला. (Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या निर्णयावर भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले, 'नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती'.

'२ हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण जात नव्हत्या, म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणतंही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? असा सवाल राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला.

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, 'त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत की जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो'.

'माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यावर उरूसावेळी तिथे जी चादर चढवली जाते ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चढवतो. इतर धर्माचा कुणी माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का? मीही अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलोय, असेही ठाकरे म्हणाले.

'आपल्याच धर्मात फक्त काही जातीनांच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. असले वाद घालणारी लोक कोत्या मनोवृत्तीची. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी त्या वादावर बोलावं बाहेरच्यांनी यात काही पडायची गरज नाही. यात कुणाला हिंसाचार घडवायचा आहे का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

Viral Video: क्रुरतेचा कळस! पत्नीने पतीला साखळीने बांधलं; घरात कोंडून केली मारहाण... धक्कादायक VIDEO

LSG vs KKR: KKR कडून पराभवाचा बदला घेण्यासाठी लखनऊचा संघ उतरणार मैदानात! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Today's Marathi News Live : पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

Bike Stunt Video Viral: भयंकर! भररस्त्यात तरूणाची बाईकवर स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

SCROLL FOR NEXT