बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी
MNS warning to banks over farmer loan recovery : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे मराठवाडा अन् पश्चिम माहाराष्ट्रात संसार उघड्यावर आले. शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी प्रत्येकाकडून मदत केली जातेय. पण अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेचा त्रास सहन करावा लागतोय. कर्ज वसुलीसाठी बँका तगदा लावत असल्याचे समोर आलेय. त्यावरून मनसेकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेसारखी मदत करण्यात यावी, अशीही मागणी मनसेकडून कऱण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, अथवा त्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास दिला तर मनसे स्टाईल न्याय मागू असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिलाय. ते धाराशिवमध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगदा लावू नका. आम्ही हात जोडून न्याय मागतो नाहीतर हात सोडून न्याय मागू, असा गंभीर इशारा नांदगावकरांनी दिला. शेतकरी कर्ज वसुलीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बँकांना थेट इशारा दिला. शेतकरी जमीन सोडून कुठेही जाणार नाही, अशा काळात त्याला धीर देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भूम भागात शेतकऱ्यांना खते बी बियाणांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी नांदगावकर बोलत होते. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच आश्वासन दिलेलं,आता ते पाळावं. लाडक्या बहिणींसाठी तुम्ही मदत दिली आता शेतकऱ्यांसाठी ही मदत करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महापुरात शेतकरी उध्वस्त झाला आहे. खरिपाची पिकं हातची गेली आहेत. समोर रब्बीची पेरणी कशी करावी? हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खत बी बियाण्यांचं वाटप करण्यात आले. धाराशिवच्या भूम भागात मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खत आणि बियाणे वाटप करण्यात आलं. यावेळी शेतकरी कर्ज वसुलीवरून बाळा नांदगावकर यांनी बँकांना इशारा दिला. शेतकरी संकटात आहे हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. आम्ही पाया पडून हात जोडून न्याय मागतो, नाहीतर हात सोडून न्याय मागू असा इशारा नांदगावकर यांनी दिला. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारने पूर्ण करावे, त्यासाठी गरज पडली तर केंद्राकडून विशेष पॅकेज घ्यावं अशी मागणीही त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.