uddhav thackeray raj thackeray x
महाराष्ट्र

मनसे-शिवसेना युतीचं ठरलं! जागावाटपासाठी ठाकरेंचे ३ शिलेदार सज्ज, घोषणा कधी करणार?

Thackeray Brothers Move Closer Before Civic Polls: युतीबाबत ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती. शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून जागावाटपाच्या बैठकींना वेग.

Bhagyashree Kamble

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग.

  • शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून जागावाटपाच्या बैठकीला सुरूवात.

  • युतीची अधिकृत घोषणा कधी करणार?

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना, राजकीय घडामोडींना वेग आलाय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिका अर्थात बीएमसी निवडणुकांसाठीही नेत्यांनी कंबर कसलीय.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या राजकीय युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही पक्षांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेला सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.

निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा होताच, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय युतीची घोषणा होणार, अशी माहिती समोर आली आहे. तोपर्यंत दोन्ही पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांकडून जागावाटपावर भर देण्यात येत असल्याची माहिती आहे.

हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारला होता. दोन्ही नेत्यांनी मराठी अस्मितेसाठी मोर्चेचं अस्त्रही हाती घेतलं होतं. मात्र, त्यानंतर शासनाने हिंदी भाषा सक्तीसंदर्भातील जीआर रद्द केला. याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येत विजयोत्सव साजरा केला होता. यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या. मात्र, अद्याप तरी दोन्ही नेत्यांनी युती झाली असल्याचे अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांत एकमत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटप ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब, सुरज चव्हाण आणि वरूण सरदेसाई या नेत्यांवर जागावाटपाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, ठाण्यात राजन विचारे, केदार दिघे यांच्यासह काही नेत्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे यांच्याकडेही जागा वाटपाबाबत चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची जबाबदारी आहे.

अलिकडेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबईतील विभागप्रमुखांची विभागनिहाय बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येक वार्डातील राजकीय परिस्थिती आणि समीकरणे जाणून घेतली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आगामी मुंबई महापालिकेसाठी मागता येणाऱ्या जागांची यादी शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि उपशहर अध्यक्षांकडून मागवून घेतली होती. यावर आता चर्चा सुरूये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम? भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती?

School Bag Policy: शाळेच्या दप्तराचे वजन किती असावे? सरकारने दिले स्पष्ट आदेश

पंतप्रधान मोदींमुळे मुघलांचा इतिहास कमी झाला: CM फडणवीस

पीएम आवास योजनेच्या इमारतीचं गेट कोसळलं अन्... निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ|VIDEO

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार, बडा नेता माजी नगरसेवकांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT