Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मविआ आणि मनसे एकत्र येणार? राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पोस्टने राजकारणात नवं वादळ

Maharashtra News : ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी मविआ आणि मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. ठाण्यातील वाहतूक, पाणीटंचाई, आणि नागरी समस्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर विरोधक एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

Alisha Khedekar

  • ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी मविआ आणि मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली.

  • या बैठकीत वाहतूक, पाणीटंचाई आणि नागरी प्रश्नांवर चर्चा झाली.

  • राजन विचारे, अविनाश जाधव आणि विक्रांत चव्हाण हे नेते या बैठकीला उपस्थित होते.

  • या बैठकीमुळे महायुतीविरोधात विरोधक एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यामध्ये महायुती विरोधात मविआ आणि मनसेची लवकरच एकजूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नाद निवासस्थानी मविआ आणि मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः या बैठकीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत नागरिक समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली." ठाण्यातील वाहतूक कोंडी, डंपिंग, पाणीटंचाई आणि रस्ते-मेट्रोमुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांवर चर्चा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद निवासस्थानी महायुती विरोधात मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांची आणि मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे, राजन विचारे, विक्रांत चव्हाण, अविनाश जाधव हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचा व्हिडिओ आव्हाड यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत समस्यांबाबत तासभर चर्चा झाल्याची माहिती त्या पोस्टमध्ये दिली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या बैठकीची माहिती सोशल मिडीयावरती पोस्ट शेअर केली आहे, मी, शिवसेना (उबाठा) चे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा, पाणी टंचाईचा मुद्दा आणि रस्ते, मेट्रोची कामे त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्यांसाठी सर्व विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटताना दिसून येत आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा उचलून धरला जाईल पण विशेष बाब म्हणजे एकीकडे मविआच्या बैठकीत मनसेचे नेते दिसायला लागले आहेत. आत्ता एकत्र दिसत असलेले नेते आगामी काळात देखील निवडणुकीत देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीविरुद्ध मविआ आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे संकेत या बैठकीच्या माध्यमातून दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: 'तू महाराष्ट्राचा बिहार केलास…'; गौतमी पाटीलवर संतापला मराठी अभिनेता, म्हणाला -'तुझे काळे धंदे…'

Maharashtra Live News Update: राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा - शरद पवार

Cough syrup : 'कफ सिरप'मुळे १४ मुलांचा मृत्यू, नागपूरमधील विक्री थांबवली

Mumbai Crime: '₹५०० दे अन् खोलीत चल...' जळगावचा व्यापारी मुंबईत हनी ट्रॅपमध्ये अडकला, मुलींनी असं काही केले की...

Pune Porsche Case : पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अग्रवाल कुटुंब पुन्हा चर्चेत, सील केलेलं हॉटेल पुन्हा मिळालं

SCROLL FOR NEXT