Nilesh Rane vs Vaibhav Naik saam tv
महाराष्ट्र

Nilesh Rane News : वैभव नाईक मुख्यमंत्र्यांना गुपचुप भेटतात, निलेश राणेंचा गौप्यस्फोट

Kokan Political News :स्वतःच्या स्वर्थासाठी मधेच लटकू नका त्याने मतदारसंघाच नुकसान होईल असे राणेंनी नाईकांना आवाहन केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी एकदा जाहीर कराव की ते उद्धव ठाकरेंसोबत (uddhav thackeray) आहेत की शिंदे साहेबांसोबत (cm eknath shinde) कारण नाईक हे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अँन्टीचेंबरमध्ये गुपचूप भेटतात असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे (former mp nilesh rane) यांनी केला. ते कुडाळ मधील कार्यकर्ता मेळाव्यात बाेलत हाेते. (Maharashtra News)

माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) म्हणाले वैभव नाईक यांनी शिंदेसाहेबांची ऑफर स्विकारली की नाही ते एकदा मतदारसंघात येऊन जाहीर कराव. दोन्ही दगडावर पाय ठेवून मतदारांची दिशाभूल करू नये अशी टीकाही माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे. स्वतःच्या स्वर्थासाठी मधेच लटकत राहू नका त्याने मतदारसंघाच नुकसान होईल असंही निलेश राणे यांनी वैभव नाईक यांना आवाहन केले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर (vikas kudalkar) यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात (bjp) प्रवेश केला आहे. पाच वर्षापूर्वी त्यांनी राणेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पाच वर्षांनंतर ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.

त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. विकास कुडाळकर हे कुडाळ पिंगुळी परीसरातील सक्रीय स्थानिक नेते असून त्यांनी कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे या परिसरात भाजपची ताकद वाढली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT