MLA Vaibhav Naik , Narayan Rane, sindhudurg, acb  saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Political News : हिम्मत असेल तर..., वैभव नाईकांनी राणेंना दिलं ओपन चॅलेंज

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

MLA Vaibhav Naik : माझी चौकशी हाेईल, त्याला मी सामोर जाईन मात्र माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशोबी असेल तर मला फासावर लटकवा असे माझे पोलिसांना आवाहन आहे. परंतु मला अटक करून मी भारतीय जनता पार्टी (bjp) किंवा राणें समोर झुकेन असे कोणाला वाटत असेल तर हे शक्य होणार नाही. कितीही प्रयत्न करा मी कारवाईला भिक घालणार नाही व दबावाला झुकणार नाही असे ठाम मत आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी व्यक्त केले. (Sindhudurg Latest Marathi News)

आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर एसीबीची कारवाई व्हावी यासाठी राणेंच प्रयत्न करीत असल्याचे हे आता सिद्ध झाले. राणेंच्या (narayan rane) दबावाला आम्ही यापूर्वी भिक घातली नाही आणि यापुढेही घालणार नाही. या देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याचे नाईक यांनी म्हटलं. (Maharashtra News)

नाईक म्हणाले भाजपच्या नेत्यानी वैभव नाईक यांना अटक (arrest) करा अशी मागणी केली आहे. याच गाेष्टीला आमचा विरोध आहे. तुम्ही दबाव आणणार आणि तुमच्या दबावाला भिक घालून आम्ही तुमच्या पक्षात येणार असा समज असेल तर ताे चुकीचा आहे. आम्ही काेणाच्या दबावाला झुकणार नाही असं ठाम मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. (Breaking Marathi News)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार वैभव नाईक यांनी हिम्मत असेल तर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी (सन 2024) मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी असे आव्हान राणेंना दिले आहे. आमदार नाईक म्हणाले यापर्वी मी नारायण राणेंना पराभुत केले आहे. जर तुम्ही खरे राणे असाल तर माझ्या समोर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जा असे नाईक यांनी पत्रकार परिषदेतून राणेंना खुले आव्हान दिलं.

भाजपच्या कालच्या मोर्चा नंतर वैभव नाईक यांनी कुडाळ येथील शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषद घेत भाजपच्या कालच्या मोर्चाला प्रतिउत्तर देत आव्हान दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT