mla vaibhav naik criticizes mp narayan rane on dpdc election sindhudurg saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Politics: आधी काॅंग्रेस संपवली आता भाजप संपणार; वैभव नाईकांचा नारायण राणेंच्या राजकारणावर टाेला

स्वत:ची सहा लाख मते आहेत असे राणे सांगतात असेही नाईक यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

स्वतःच्या स्वार्थासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळामध्ये झालेल्या अशासकीय सदस्य निवडीत भाजपचे उरलं सुरलं अस्तित्व नारायण राणे (mp narayan rane) यांनी संपवल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीचा धागा पकडत राणेंवर जोरदार टीका केली. (Maharashtra News)

भाजप शिवसेनेला संपविण्याच्या नादात आपणच संपल्याचे काल दिसून आल्याचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले. ते म्हणाले नारायण राणेंनी स्वत:च्या स्वार्थासाठी यापूर्वी काॅंग्रेस पक्ष येथे संपविला. आता ते भाजपला संपवत आहेत.

भाजपला चार पदे आणि शिंदे-राष्ट्रवादी गटास आठ पदे दिली गेली. हे सर्व राणेंनी त्यांच्या मुलांच्या राजकीय स्वार्थासाठी केले. या जिल्ह्यात भाजप-सेना युती असताना भाजपचे जिल्हा नियाेजन मंडळात पाच सदस्य हाेते. आता ते चारवर आलेत असेही आमदार नाईक यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वत:ची सहा लाख मते आहेत असे सांगतात आणि जिल्हा नियाेजन मंडळात त्यांनी भाजपची काय अवस्था करुन ठेवली हे सर्वांनी पाहिले. खरंतर या जिल्ह्यातील भाजपच्या निष्ठावन कार्यकर्त्यांनी स्वत:चे अस्तित्व ठेवावे असे आवाहन देखील आमदार नाईक यांनी राणेंवर टीका करताना भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

Ulhasnagar Tourism: उल्हासनगरपासून अवघ्या ८४ किमी अंतरार वसलंय 'हे' शांत आणि थंडगार ठिकाण; आजच प्लान करा

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

SCROLL FOR NEXT